Amit Deshmukh will follow up on allowances for nurses
औरंगाबाद : औरंगाबाद येथील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या कामाचा वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी आढावा घेतला. या बैठकीस वैद्यकीय शिक्षण विभागाचे संचालक डॉ. दिलीप म्हसेकर, जे. एम. सी. औरंगाबादचे अधिष्ठाता वर्षा राठी, वैद्यकीय शिक्षण विभागाचे सहसचिव शिवाजी पाटणकर, उपसचिव प्रकाश सुरवसे, वैशाली सुळे, आदी उपस्थित होते.
औरंगाबाद वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे विविध प्रलंबित प्रश्न, प्रशासकीय अधिकारी व अधीक्षक यांच्या पात्रता निश्चित करण्यात करणे, कार्यक्षम वैद्यकीय अधीक्षक आणि वैद्यकीय अधिकारी नियमितरित्या भरणे, रुग्णालयात मंजूर असलेल्या 1177 खाटांपेक्षा जास्त रुग्ण खाटा सुरु असल्याने निधीचा कमतरता, औषधी, सर्जिकल, यंत्रसामुग्री आणि उपकरणे, पूर्णवेळ प्रशासकीय अधिकारी यांची नियुक्ती करणे अशा विविध विषयांवर या बैठकीत चर्चा करण्यात आली. औरंगाबाद वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील नर्सिंग पदाची भरती बाबत जाहिरात देवून ती पदे तातडीने भरावी, असे निर्देश देशमुख यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. वैद्यकीय शिक्षण विभागातील अध्यापकीय पदे व वर्ग 3 व 4 गटातील रिक्त पदे प्राधान्याने भरण्याची कार्यवाही करावी. औरंगाबाद येथील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाबाबतच्या विविध विषयांच्या अनुषंगाने तातडीने कार्यवाही करुन संबंधित विषयाला गती द्यावी, असे निर्देशही मंत्री देशमुख यांनी दिले.
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…
मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…
पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…
मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…
पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…