छत्रपती संभाजी नगर

दुःखद! अग्निवीर भरतीमध्ये चाचणीदरम्यान धावताना तरुणाचा मृत्यू, औरंगाबादमधील घटना

औरंगाबाद : अग्निवीर भरतीमध्ये मैदानी चाचणीदरम्यान धावत असताना एका तरुणाचा मृत्यू झाल्याची दुःखद घटना घडली आहे. ही घटना बुधवारी रात्री साडेबाराच्या दरम्यान औरंगाबादमध्ये घडली. करण नामदेव पवार (वय- २०, रा. विठ्ठलवाडी, सिर्जापूर, ता. कन्नड, जि औरंगाबाद) असे मृत तरुण उमेदवाराचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कन्नड तालुक्यातील करण आणि सागर हे दोन सख्खे भाऊ अग्निवीर भरतीसाठी बुधवारी संध्याकाळी औरंगाबाद येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात दाखल झाले होते. यावेळी रात्रीच्या दरम्यान मैदानी चाचणी घेण्यात आली. त्यावेळी करणने मैदानाचे तीन चक्कर पूर्ण केले होते. मात्र शेवटचा चक्कर पूर्ण करण्यासाठी अवघे पाच फूट अंतर शिल्लक असताना करण अचानक मैदानात कोसळला. त्याला तात्काळ शासकीय घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

या प्रकरणी बेगमपुरा पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या तरुणाचा मृत्यू नक्की कसा झाला ते शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर स्पष्ट होईल. या घटनेमुळे करणच्या कुटुंबावर शोककळा पसरली आहे.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

7 दिवस ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

7 दिवस ago

पुण्यात विषारी दारू प्यायल्याने १२ जणांचा मृत्यू, दोषींवर कठोर कारवाईचे आदेश

मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…

7 दिवस ago

व्यसनमुक्ती क्षेत्रातील अविरत समाजकार्याची दखल; डॉ. सोमनाथ गिते यांचा मा. माधुरीताई मिसाळ यांच्या हस्ते सत्कार

पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…

2 आठवडे ago

भरतीच्या बोगस जाहिरातींपासून सावध राहण्याचे आवाहन

मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…

3 आठवडे ago

पुण्यात उष्णतेचा कहर! IMD चा यलो अलर्ट जारी; नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन

पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…

3 आठवडे ago