Changes will be made to the current schedule of local trains
मुंबई : लोकल प्रवासावरील वेळमर्यादेमुळे अनेक मुंबईकर त्रस्त आहेत. या वेळमर्यादेमुळे राज्य सरकारच्या निर्णयाबाबत नाराजी व्यक्त केली जात आहे. याची दखल घेत लोकलच्या वेळेत बदल करण्याचे संकेत काही दिवसांपूर्वीच आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिले होते. त्यानंतर आज मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे.
काकाणी यांनी सांगितलं कि, ‘लोकल ट्रेनसह मुंबईतील सर्व व्यवहार पूर्वीप्रमाणे सुरळीत होणे हे कोरोना रुग्णांच्या संख्येवर अवलंबून आहे. सर्वांसाठी लोकल खुली होऊन आठवडा उलटल्यानंतरही कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ झालेली नाही. पुढील १५ दिवस अशीच परिस्थिती राहिल्यास लोकल ट्रेनच्या सध्याच्या वेळापत्रकात बदल केले जातील आणि मुंबईकरांना दिलासा मिळेल.’
सध्या मुंबईतील लोकल ट्रेन सकाळी पहिल्या गाडीपासून सात वाजेपर्यंत, दुपारी १२ ते ४ या वेळेत आणि रात्री ९ नंतर सर्वांसाठी खुली आहे. त्यामुळं काही प्रमाणात दिलासा मिळाला असला तरी अनेक मुंबईकर या वेळमर्यादेमुळे त्रस्त आहेत. कुठल्याही कामासाठी बाहेर पडताना सर्वसामान्यांना ट्रेनचे वेळापत्रक पाहावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर सुरेश काकाणी यांनी दिलेली माहिती काहीशी दिलासादायक मानली जात आहे.
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…
मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…
पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…
मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…
पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…