महाराष्ट्र

प्रवेश प्रक्रियेच्या अंतिम दिनांकापर्यंत प्रमाणपत्रे सादर करण्यास मुभा – चंद्रकांत पाटील

मुंबई : शैक्षणिक वर्ष 2022-23 करिता विविध अभ्यासक्रमांच्या केंद्रिभूत प्रवेश प्रक्रियेसाठी उमेदवारांना लागणारी विविध प्रमाणपत्रे प्रवेश प्रक्रियेच्या अंतिम दिनांकापर्यंत सादर करण्यास मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज दिली.

केंद्रिभूत प्रवेश प्रक्रियेद्वारे विद्यार्थ्यांना प्रवेशित होताना विविध प्रमाणपत्रे सादर करावी लागतात. त्यामध्ये EWS/NCL/CVC/TVC या प्रमाणपत्रांचाही समावेश असतो. विद्यार्थ्यांना असे प्रमाणपत्र वेळीच प्राप्त करुन घेताना विविध अडचणींना सामोरे जावे लागते. त्यामुळे तत्काळ जात वैधता प्रमाणपत्र मिळवून विहित वेळेत केंद्रीय प्रवेश नियामक प्राधिकरणास सादर करणे विद्यार्थ्यांना शक्य होत नसल्याचे निदर्शनास आले. विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊन विद्यार्थ्यांना शैक्षणिक वर्ष 2022-23 च्या प्रवेश प्रक्रियेच्या अंतिम दिनांकापर्यंत मूळ प्रमाणपत्रे केंद्रीय प्रवेश नियामक प्राधिकरणास सादर करण्याची मुभा देण्यात आली आहे, असेही मंत्री पाटील यांनी सांगितले.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

स्वातंत्र्यदिनानिमित्त डॉ. सोमनाथ गिते यांचा महापौरांच्या हस्ते गौरव

पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…

1 महिना ago

लग्न ठरलेल्या प्रियकरासोबत तरुणीचा संशयास्पद मृत्यू; आईचा गंभीर आरोप

बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…

1 महिना ago

चार महिन्यांपूर्वीचा नवाकोरा रस्ता ऑप्टिकल फायबरसाठी फोडला; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांचा संताप; काम बंद पाडून अधिकाऱ्यांना जाब

नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…

1 महिना ago

‘उघडलेले पुस्तक’ पॅनेलचा दणदणीत विजय; सर्व १५ उमेदवार विजयी; सर्व प्रवर्गांत परिवर्तन आणि सुशासन पॅनेलला यश

पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…

1 महिना ago

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

4 महिने ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

4 महिने ago