Central approval of paddy and coarse grain purchase plan
मुंबई : राज्य शासनाने केंद्र सरकारकडे सादर केलेल्या धान व भरडधान्य खरेदीच्या आराखड्यास केंद्राने मान्यता दिली असून, राज्यास 1 कोटी, 49 लाख क्विंटल धान व 61,075 क्विंटल भरडधान्य खरेदीस परवानगी दिल्याची माहिती अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिली. खरीप पणन हंगाम 2022 – 23 मध्ये धान व भरडधान्य खरेदी संदर्भात मंत्रालयात त्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. यावेळी विभागाचे सचिव विजय वाघमारे, मार्केट फेडरेशनचे व्यवस्थापकीय संचालक सुधाकर फेले, पालघरचे जिल्हाधिकारी गोविंद बोडके, सहसचिव सुधीर तुंगार, उपायुक्त पुरवठा व सर्व जिल्हा पुरवठा अधिकारी उपस्थित होते.
मंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिले हे निर्देश
केंद्र सरकारने खरीप पणन हंगाम 2022 – 23 करीता जाहीर केलेल्या आधारभूत किंमती पुढीलप्रमाणे.
धान साधारण दर्जा 2040 रु. प्रति क्विंटल तर अ दर्जाच्या धानाकरीता 2060 रु. रक्कम निर्धारित करण्यात आली आहे. संकरित ज्वारीसाठी 2970 रु. तर मालदांडीसाठी 2990 रु. रक्कम निर्धारित करण्यात आली आहे. बाजरी 2350, रागी 3578, मका 1962 रु. अशा किंमती निर्धारित करण्यात आल्याचे यावेळी सांगण्यात आले.
पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…
बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…
नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…
पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…