महाराष्ट्र

रस्ता ओलांडणाऱ्या चिमुकलीला वाचवण्याच्या प्रयत्नात कार ६ वेळा पलटली; १ ठार, ८ जखमी

डोळासणे : रस्ता ओलांडत असलेल्या मुलीला वाचवण्याच्या प्रयत्नात पुणे-नाशिक माहामार्गवरील डोळासणे येथे भीषण अपघात झाला आहे. भरधाव वेगात असलेल्या कारच्या चालकाने अचानक ब्रेक दाबल्याने कार पलटली. या अपघातात कारमधील एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला असून ८ जण जखमी झाले आहेत. पुणे आणि अहमदनगर जिल्ह्याच्या हद्दीवर हा अपघात झाला आहे.

विजय शंकर डेरे (वय ६२, रा. नारायणगाव) असं मृत व्यक्तीचं नाव असून कारमधील रोहित विजय डेरे (वय २३), उज्ज्वला विजय डेरे (वय ४८), मोहित विजय डेरे (वय ३०), सविता अनिल शेटे (वय ४८), शैला दिलीप वारुळे (वय ५८), विनायक शिवाजी डेरे (वय ५०, सर्व रा. नारायणगाव) तसेच शोभा दशरथ वायाळ (वय ५४, रा. नांदुर, नाशिक) यांच्यासह रस्ता ओलांडणारी वैष्णवी विश्वास मेंगाळ (वय १२ ) अशी जखमींची नावे आहेत.

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, पुणे-नाशिक महामार्ग डेरे कुटुंब हे नाशिक येथून अस्थी विसर्जन करून आपल्या नारायणगाव येथील घरी परतत होते. त्याचवेळी डोळासणे येथील बांबळेवाडी शिवारात वैष्णवी मेंगाळ ही चिमुकली रस्त्याच्या दुभाजकातून अचानक रस्ता ओलांडण्याचा प्रयत्न करू लागली. हे चालक असलेल्या विनायक डेरे यांच्या लक्षात आल्याने त्यांनी त्या चिमुकलीला वाचवण्यासाठी कारचा ब्रेक दाबला. वेग असल्याने ही कार पाच ते सहा वेळा पलटी होऊन रस्त्याच्या बाजूला महामार्गाच्या खाली जाऊन थांबली. या अपघातात विजय डेरे यांचा जागीच मृत्यू झाला, तर चिमुकलीसह आठ जण जखमी झाले आहेत. महामार्ग पोलिसांनी जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल केले असून यामुळे मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली होती.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

स्वातंत्र्यदिनानिमित्त डॉ. सोमनाथ गिते यांचा महापौरांच्या हस्ते गौरव

पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…

1 महिना ago

लग्न ठरलेल्या प्रियकरासोबत तरुणीचा संशयास्पद मृत्यू; आईचा गंभीर आरोप

बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…

1 महिना ago

चार महिन्यांपूर्वीचा नवाकोरा रस्ता ऑप्टिकल फायबरसाठी फोडला; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांचा संताप; काम बंद पाडून अधिकाऱ्यांना जाब

नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…

1 महिना ago

‘उघडलेले पुस्तक’ पॅनेलचा दणदणीत विजय; सर्व १५ उमेदवार विजयी; सर्व प्रवर्गांत परिवर्तन आणि सुशासन पॅनेलला यश

पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…

2 महिने ago

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

4 महिने ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

4 महिने ago