मुंबई : मांतग व तत्सम जातींच्या विद्यार्थ्यांना वैद्यकीय व अभियांत्रिकी क्षेत्रात करिअर करण्यासाठी अण्णाभाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्था (आर्टी) मार्फत राज्यातील पुणे, मुंबई, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, लातूर, अमरावती व नागपूर या ठिकाणी जेईई (JEE) व नीट (NEET) परीक्षेचे पूर्व प्रशिक्षण देण्यात येत आहे. त्यासाठी निवड झालेल्या उमेदवारांनी प्रशिक्षण केंद्राची निवड करावी, असे आवाहन आर्टीचे व्यवस्थापकीय संचालक सुनील वारे यांनी केले आहे.
जेईई व नीट प्रशिक्षण देणाऱ्या विद्यार्थ्यांची तात्पुरती निवड यादी व प्रतीक्षा यादी आर्टीने प्रसिद्ध केली होती. त्यानुसार विद्यार्थ्यांच्या कागदपत्रांची पडताळणी करण्यात आली. कागदपत्रे पडताळणी पूर्ण केलेल्या उमेदवारांची प्रशिक्षणासाठी अंतिम निवड करण्यात आली असून अशा विद्यार्थ्यांची यादी आर्टीच्या संकेतस्थळावर लावण्यात आली आहे. निवड झालेल्या विद्यार्थ्यांनी https://cpetp.barti.in/ या संकेतस्थळावर जाऊन १० नोव्हेंबर २०२५ पर्यंत प्रशिक्षण केंद्राची निवड करावी. जेईई व नीटसाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांना नि:शुल्क प्रशिक्षण, दरमहा ६ हजार रुपये विद्यावेतन, त्याचबरोबर पुस्तकांसाठी वर्षातून एकवेळ पाच हजार रुपये आणि प्रशिक्षण केंद्रांना त्यांचे शुल्क आर्टीच्या वतीने देण्यात येणार असल्याचे व्यवस्थापकीय संचालक वारे यांनी सांगितले.
बीड : बीड जिल्ह्यात एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. परळी तालुक्यातील…
मुंबई : देशातील हवामानात पुन्हा एकदा मोठे चढउतार पाहायला मिळत आहेत. हवामान विभागाने दिलेल्या ताज्या…
नाशिक : नाशिक जिल्ह्यातील निफाड परिसरात बेपत्ता झालेल्या एका परिचारिकेचा मृतदेह २४ दिवसांनी विहिरीत सापडल्याने…
नागपूर : ज्येष्ठ नेते व माजी मंत्री दत्ताभाऊ मेघे यांच्या निधनाचे वृत्त समजताच विदर्भात शोककळा…
पुणे : वाकड परिसरात २८ वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनिअर महिलेची लग्नाच्या आमिषाने तब्बल ४२.६४ लाख रुपयांची…
मुंबई : २४ वर्षीय सागर गुप्ता या तरुणाचा मृत्यू झाला असून, त्याच्या हत्येप्रकरणी त्याच्या बहिणीचा…