महाराष्ट्र

वैद्यकीय उपकरणांच्या खरेदी विक्रीसाठी नोंदणी प्रमाणपत्रासाठी अर्ज करण्याचे आवाहन

मुंबई : सन-2017 मध्ये केंद्र शासनाने औषधे व सौंदर्य प्रसाधने कायदा 1940 अंतर्गत वैद्यकीय उपकरणे नियम 2017 पारित केले आहेत. यानियमानुसार रुग्णांच्या उपचारासाठी व रोग निदानासाठी लागणाऱ्या बऱ्याच उपकरणांचा त्यामध्ये अंतर्भाव केला असून वैद्यकीय उपकरणांची “अ”, “ब”, “क” “ड” अशी वर्गवारी केली आहे. “अ” आणि “ब” याप्रवर्गातील उपकारणांच्या उत्पादनावर राज्याचे नियंत्रण आहे तसेच “क” आणि “ड” वैद्यकीय उपकरणांच्या उत्पादनावर केंद्र शासनाचे नियंत्रण आहे.

वैद्यकीय उपकरणांचे उत्पादन करण्यासाठी केंद्र शासनाने तयार केलेल्या सुगम पोर्टल या संगणक प्रणालीद्वारे “अ” आणि “ब” याप्रवर्गातील उपकरणांच्या उत्पादकांना राज्याद्वारे परवाने मंजूर करण्यात येत आहेत.

सर्व वैद्यकीय उपकरणांच्या विक्रीसाठी औषधे व सौंदर्य प्रसाधने नियमानुसार परवाने मंजूर करण्याची तरतूद आहे व त्यानुसार राज्यातील परवाना प्राधिकारी यापूर्वी पासून परवाने मंजूर करीत आहेत.

केंद्र शासनाच्या 30 सप्टेंबर 2022 च्या अधिसूचनेनुसार वैद्यकीय उपकरणांच्या खरेदी-विक्रीसाठी परवान्या ऐवजी नोंदणी प्रमाणपत्र घेऊ शकण्याची तरतूद अंर्तभूत करण्यात आली आहे. या अधिसूचनेनुसार राज्यांचे औषध नियंत्रक यांना परवाना नोंदणी प्रमाणपत्र मंजुरीसाठी परवाना प्राधिकारी नेमण्याबाबत निर्देशित करण्यात आले आहे. यानुसार नोंदणी प्रमाणपत्र मंजुरी प्राधिकारी निश्चित करून, नोंदणी प्रमाणपत्र देण्याची कार्यवाही प्रशासनामार्फत लवकरच पूर्ण करून, नोंदणी प्रमाणपत्रे लवकरात लवकर निर्गमित करण्यात येतील.

वैद्यकीय उपकरणांच्या खरेदी-विक्रीसाठी नोंदणी प्रमाणपत्र घेऊ इच्छिणारे अर्जदार हे विहीत नमुन्यांत आवश्यक शुल्कासह ऑफलाईन पद्धतीने आवश्यक कागदपत्रांसह प्रशासनाच्या जिल्हा कार्यालयात अर्ज करू शकतात, असे आवाहन सहआयुक्त (औषधे), मुख्यालय तथा नियंत्रण प्राधिकारी अन्न व औषध प्रशासन यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

1 आठवडा ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

1 आठवडा ago

पुण्यात विषारी दारू प्यायल्याने १२ जणांचा मृत्यू, दोषींवर कठोर कारवाईचे आदेश

मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…

1 आठवडा ago

व्यसनमुक्ती क्षेत्रातील अविरत समाजकार्याची दखल; डॉ. सोमनाथ गिते यांचा मा. माधुरीताई मिसाळ यांच्या हस्ते सत्कार

पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…

2 आठवडे ago

भरतीच्या बोगस जाहिरातींपासून सावध राहण्याचे आवाहन

मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…

3 आठवडे ago

पुण्यात उष्णतेचा कहर! IMD चा यलो अलर्ट जारी; नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन

पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…

3 आठवडे ago