British-era obsolete laws should be changed, insists Governor Bhagat Singh Koshyari
मुंबई : स्वातंत्र्य प्राप्त होऊन ७५ वर्षे होत आहेत, तरीदेखील आपल्या देशात अनेक ब्रिटिशकालीन कायदे अस्तित्वात आहेत. हे कालबाह्य कायदे बदलण्याची गरज असून त्यासाठी एक समग्र आढावा घेण्याची गरज असल्याचे आग्रही प्रतिपादन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी आज केले.
जुहू विले पार्ले मुंबई येथील मा कानबाई विद्याधाम या संस्थेने सुरु केलेल्या अधिया विधी महाविद्यालयाचे उद्घाटन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते तसेच मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता यांच्या प्रमुख उपस्थितीत आज (१३ मार्च) संपन्न झाले, त्यावेळी राज्यपाल बोलत होते. यावेळी न्या. दत्ता यांच्या पत्नी झुमा दत्ता, संस्थेचे अध्यक्ष महेंद्र घेलानी, विश्वस्त जयंत घेलानी, जनक ठक्कर व डॉ. मिनू मदलानी प्रामुख्याने उपस्थित होते. खासदार मनोज कोटक, आमदार पराग अळवणी, विधिज्ञ सतीश मानेशिंदे व इतर निमंत्रितदेखील यावेळी उपस्थित होते.
विद्यार्थी व उपस्थितांना संबोधित करताना राज्यपाल कोश्यारी म्हणाले, विधी व न्याय हा अतिशय व्यापक विषय आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी क्रमिक पुस्तकांपलीकडे जाऊन सर्वंकष अध्ययन केले पाहिजे. न्यायशास्त्र व तर्कशास्त्र या विषयांवर प्राचीन काळात भारतात विपुल चिंतन झाले असून विधी विद्यार्थ्यांनी आपल्या देशाच्या न्यायशास्त्राचादेखील अभ्यास केला पाहिजे असे राज्यपालांनी सांगितले.
आपल्या देशात इंग्रजी भाषेचे ज्ञान कमी लोकांना आहे. त्यामुळे विधी शिक्षण प्रादेशिक भाषेत उपलब्ध झाले पाहिजे तसेच विधी विद्यार्थ्यांनी व वकिलांनी मातृभाषेचा अधिकाधिक वापर केला पाहिजे, जेणेकरून सामान्य माणसाला कायदे समजणे शक्य होईल, असे राज्यपालांनी सांगितले.
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…
मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…
पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…
मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…
पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…