Boat Found At Raigad Seashore Ak 47 Rifle And Ammunition Recovered
रायगड : रायगडमधील समुद्रकिनाऱ्यावर एक बोट संशयास्पद स्थितीत आढळून आली आहे. बोटीमध्ये शस्त्रे सापडल्याचे वृत्त आहे. एका मच्छिमाराने पोलिसांना माहिती दिल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळ गाठून तपास सुरू केला. त्याचवेळी बोटीत शस्त्रे सापडल्यानंतर हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.
रायगडमधील हरिहरेश्वरमध्ये शस्त्रास्त्रांनी भरलेली बोट आढळली आहे. ही बोट पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीनं किनाऱ्यावर आणली. या बोटीत एके-४७ रायफल आणि शस्त्रास्त्रं आढळून आली आहेत. वरिष्ठ पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. सध्या रायगड पोलीस या घटनेचा तपास करत आहेत. जवळपासच्या भागात सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली असून पोलीस हाय अलर्टवर आहेत. ज्या ठिकाणी बोट सापडली ते ठिकाण मुंबईपासून 200 किलोमीटर आणि पुण्यापासून 170 किलोमीटर अंतरावर आहे.
या शस्त्रांमध्ये 3 एके-47 रायफल जप्त करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, बोटीत एकही व्यक्ती उपस्थित नव्हती.
पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…
बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…
नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…
पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…