महाराष्ट्र

अंदरसूल येथील मुलींच्या शाळा इमारतीचे मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते भूमिपूजन

नाशिक : तंत्रज्ञानाने जग जवळ आले आहे. विद्यार्थ्यांना भविष्यात अन्य देशांमध्ये करिअरच्या विविध संधी उपलब्ध होत आहेत. या स्पर्धेत टिकण्यासाठी विद्यार्थ्यांनी विविध भाषा अवगत कराव्यात. विद्यार्थ्यांनी विविध क्षेत्रात प्रावीण्य मिळवावे, असे प्रतिपादन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केले.

मंत्री भुजबळ यांच्या हस्ते आज अंदरसूल जिल्हा परिषद मुलींच्या शाळेच्या नूतन इमारतीचे भूमिपूजन करण्यात आले. यावेळी त्यांनी मुलींच्या शाळेला भेट देऊन विद्यार्थिनी आणि शिक्षकांसोबत संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी उप विभागीय अधिकारी बाबासाहेब गाढवे, तहसीलदार आबा महाजन, गटविकास अधिकारी संदीप वायाळ, कृषी अधिकारी शुभम बेरड, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राधाकिसन सोनवणे, अल्पसंख्यांक आयोगाचे सदस्य हुसेन शेख, सरपंच लता जानराव, उपसरपंच अमोल सोनवणे यांच्यासह शिक्षक, कर्मचारी व पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी मंत्री भुजबळ म्हणाले की, सारथी, बार्टी, महाज्योतीच्या माध्यमातून राज्य शासन विद्यार्थ्यांना परदेशी शिक्षण घेण्यासाठी शिष्यवृत्ती देण्यात येत आहे. विद्यार्थ्यांनी या योजनेचा लाभ घेऊन शिक्षण घ्यावे. अंदरसूल जिल्हा परिषदेच्या या शाळेतून विद्यार्थी शालेय जीवनापासूनच यासाठी तयारी करत आहे. ही बाब अतिशय कौतुकास्पद असून यामध्ये शिक्षकांचे योगदान अतिशय महत्वाचे आहे. मुलींच्या शिक्षणासाठी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी अतिशय महत्त्वाचे कार्य केले आहे. त्यामुळे आज मुली विविध क्षेत्रात प्राविण्य मिळवत आहे. त्यांच्या कार्याची प्रेरणा घेऊन मुलींनी उच्च शिक्षण घेऊन विविध क्षेत्रात प्राविण्य मिळवावे, असे आवाहन मंत्री भुजबळ यांनी केले.

या सोहळ्याप्रसंगी अंदरसूल जिल्हा परिषद शाळेतील मुलींनी जपानी भाषेतून अनोख्या पद्धतीने मंत्री भुजबळ यांचे स्वागत केले. तसेच या शाळेतील विद्यार्थिनींनी कोडिंग- डिकोडिंग च्या माध्यमातून तयार करण्यात आलेल्या ऍप्लिकेशनचे सादरीकरण केले. तसेच इयत्ता चौथीत शिक्षणाऱ्या विद्यार्थिनीने २७ अंकी आकड्यांचे वाचन उपस्थितांसमोर सादर केले.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

1 महिना ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

1 महिना ago

पुण्यात विषारी दारू प्यायल्याने १२ जणांचा मृत्यू, दोषींवर कठोर कारवाईचे आदेश

मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…

1 महिना ago

व्यसनमुक्ती क्षेत्रातील अविरत समाजकार्याची दखल; डॉ. सोमनाथ गिते यांचा मा. माधुरीताई मिसाळ यांच्या हस्ते सत्कार

पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…

2 महिने ago

भरतीच्या बोगस जाहिरातींपासून सावध राहण्याचे आवाहन

मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…

2 महिने ago

पुण्यात उष्णतेचा कहर! IMD चा यलो अलर्ट जारी; नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन

पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…

2 महिने ago