बीड

विद्यार्थी व शिक्षकांचा उत्साह पाहून वेगळाच आनंद झाला – धनंजय मुंडे

बीड : कोविड कालावधीच्या मोठ्या ब्रेकनंतर प्रथमच परळी तालुक्यातील टोकवाडी येथील जिल्हा परिषद शाळेत उपस्थित झालेल्या विद्यार्थ्यांना पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी गुलाब पुष्प देत त्यांचे शाळेत स्वागत केले. विद्यार्थ्यांच्या वर्गात जाऊन त्यांच्याशी संवाद साधत पालकमंत्री मुंडे यांनी ‘वेलकम बॅक टू स्कूल…’ म्हणताच विद्यार्थ्यांनी एका सुरात ‘थँक यू सर…’ म्हणत दिलेल्या प्रतिसादाने शाळेत चैतन्याचे वातावरण निर्माण झाले.

कोविडच्या काळात जवळपास दीड वर्ष शाळा बंद राहिल्यानंतर, आता दुसरी लाट ओसरली आहे. राज्य सरकारने शाळांची घंटा वाजवण्याचा निर्णय घेतला असून राज्यात शाळा सुरू झाल्या असून राज्यभरात शिक्षणोत्सव साजरा केला जात आहे. या पार्श्वभूमीवर बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी जिल्हा परिषद शाळा, टोकवाडी येथे जाऊन विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले व शिक्षणोत्सव पुढे अखंडित सुरू राहावा, अशा शुभेच्छा दिल्या.

पुन्हा नव्याने शाळा सुरू झाल्या आहेत, त्या आता कायम सुरू राहाव्यात यासाठी मास्क, सॅनिटायझर, अन्य स्वछता याबाबत दक्षता घेण्यात यावी. यासह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे प्राधान्याने लसीकरण केले जावे, शाळेचा परिसर स्वच्छ ठेवावा याबाबत संबंधितांना सक्त सूचना पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी दिल्या आहेत. यावेळी पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते मान्यवरांच्या उपस्थितीत शाळेच्या आवारात वृक्षारोपण देखील करण्यात आले.

मधल्या काळात शाळा बंद राहिल्या पण शाळा पुन्हा सुरू होताना विद्यार्थी व शिक्षकांच्या मनातील उत्साह एक वेगळाच आनंद देतो आहे. तसेच मधल्या काळात झालेले शैक्षणिक नुकसानही भरून निघेल असा विश्वास वाटत असल्याची प्रतिक्रिया मंत्री धनंजय मुंडे यांनी व्यक्त केली आहे.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

स्वातंत्र्यदिनानिमित्त डॉ. सोमनाथ गिते यांचा महापौरांच्या हस्ते गौरव

पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…

3 आठवडे ago

लग्न ठरलेल्या प्रियकरासोबत तरुणीचा संशयास्पद मृत्यू; आईचा गंभीर आरोप

बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…

4 आठवडे ago

चार महिन्यांपूर्वीचा नवाकोरा रस्ता ऑप्टिकल फायबरसाठी फोडला; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांचा संताप; काम बंद पाडून अधिकाऱ्यांना जाब

नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…

4 आठवडे ago

‘उघडलेले पुस्तक’ पॅनेलचा दणदणीत विजय; सर्व १५ उमेदवार विजयी; सर्व प्रवर्गांत परिवर्तन आणि सुशासन पॅनेलला यश

पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…

1 महिना ago

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

3 महिने ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

3 महिने ago