बीड

विवाहितेची सॅनिटायझर पिऊन आत्महत्या, सासरच्यांचा सत्य लपवण्याचा प्रयत्न फसला…

बीड : बीडच्या पाटोदा तालुक्यात एका विवाहित महिलेने सॅनिटायझर पिऊन आत्महत्या केली. पूजा गणेश रायकर (वय 21) असं आत्महत्या करणाऱ्या महिलेचं नाव आहे. पूजाला वारंवार सासरीच्या मंडळींकडून त्रास दिला जात होता. या त्रासाला कंटाळून आत्महत्या करण्याचं टोकाचं पाऊल तिने उचललं.

मिळालेल्या माहितीनुसार, लग्न झाल्यानंतर सासरी काही ना काही कारण काढून पूजाचा छळ सुरु होता. सुरुवातीला मुल होत नाही म्हणून पूजाचा छळ सुरू होता. त्यानंतर तिच्या सासरच्या मंडळींनी कार घेण्यासाठी तिच्याकडे पैशांची मागणी केली. पण माहेरची परिस्थिती हलाखीची असल्यामुळे तिने पैसे आणले नाही. त्यामुळे तिचा छळ करण्यात येत होता. पुढे हा त्रास वाढत गेला आणि तिला रोज मारहाण करणं, उपाशी ठेवणं, असे प्रकार सुरु झाले. रोजच्या जाचाला कंटाळून पूजाने आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला. १९ मे रोजी तिने सॅनिटायझर प्यायले, त्यानंतर तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं, तिथे तिच्यावर उपचार सुरू होते. परंतु, २६ तारखेला तिचा मृत्यू झाला.

पूजाचा मृत्यू झाल्यानंतर तिच्या सासरच्यांनी सत्य लपवण्याचा प्रयत्न केला. आत्महत्येचे प्रकरण समोर येऊ नये यासाठी तिला कोरोना झाला असल्याचा खोटा अहवाल तयार केला. परंतु, शवविच्छेदनात सत्य समोर आले. त्यानंतर पूजाच्या सासरच्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

2 आठवडे ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

2 आठवडे ago

पुण्यात विषारी दारू प्यायल्याने १२ जणांचा मृत्यू, दोषींवर कठोर कारवाईचे आदेश

मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…

2 आठवडे ago

व्यसनमुक्ती क्षेत्रातील अविरत समाजकार्याची दखल; डॉ. सोमनाथ गिते यांचा मा. माधुरीताई मिसाळ यांच्या हस्ते सत्कार

पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…

3 आठवडे ago

भरतीच्या बोगस जाहिरातींपासून सावध राहण्याचे आवाहन

मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…

4 आठवडे ago

पुण्यात उष्णतेचा कहर! IMD चा यलो अलर्ट जारी; नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन

पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…

1 महिना ago