महाराष्ट्र

कोटपा कायद्याच्या अंमलबजावणीसाठी जनजागृती अभियान राबविण्यात यावे – मुख्य सचिव मनु कुमार श्रीवास्तव

मुंबई : कोटपा कायद्याची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी जनजागृती अभियान राबविण्यात यावे, अशा सूचना मुख्य सचिव मनु कुमार श्रीवास्तव यांनी आज येथे दिल्या. मुख्य सचिव मनु कुमार श्रीवास्तव यांच्या अध्यक्षतेखाली राज्य स्तरीय राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण समन्वय समितीची बैठक झाली. त्यावेळी त्यांनी या सूचना दिल्या.

मुख्य सचिव यांच्या दालनात झालेल्या या बैठकीस सार्वजनिक आरोग्य विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ प्रदीप व्यास, गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव संजय सक्सेना, अन्न व औषध प्रशासना विभागाचे सचिव परिमल सिंग, शालेय शिक्षण विभागाचे सचिव रणजित सिंह देओल, सामाजिक न्याय विभागाचे सचिव सुमंत भांगे, टाटा मेमोरियल हॉस्पिटलचे डॉ. पंकज चतुर्वेदी आदी उपस्थित होते.

मुख्य सचिव मनु कुमार श्रीवास्तव यांनी सांगितले की, कोटपा कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाबरोबरच विविध विभागांच्या समन्वयाची आवश्यकता आहे. विशेष करून शालेय शिक्षण विभागाने यामध्ये पुढाकार घेतला पाहिजे. शालेय जीवनातच मुलांना तंबाखूच्या दुष्परिणामांची जाणीव करून दिली तर तंबाखूच्या व्यसनांपासून मुले दूर राहतील. शालेय शिक्षण विभागाने यासाठी कृती आराखडा आखून काम करावे. बैठकीच्या सुरुवातीला डॉ. व्यास यांनी कोटपा कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी केल्या जात असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. बैठकीस सहसंचालक डॉ. पद्मजा जोगेवार, अवर सचिव तानाजी सरावणे उपस्थित होते.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

1 महिना ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

1 महिना ago

पुण्यात विषारी दारू प्यायल्याने १२ जणांचा मृत्यू, दोषींवर कठोर कारवाईचे आदेश

मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…

1 महिना ago

व्यसनमुक्ती क्षेत्रातील अविरत समाजकार्याची दखल; डॉ. सोमनाथ गिते यांचा मा. माधुरीताई मिसाळ यांच्या हस्ते सत्कार

पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…

1 महिना ago

भरतीच्या बोगस जाहिरातींपासून सावध राहण्याचे आवाहन

मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…

2 महिने ago

पुण्यात उष्णतेचा कहर! IMD चा यलो अलर्ट जारी; नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन

पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…

2 महिने ago