महाराष्ट्र

पोलीस कर्मचाऱ्याचा स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या करण्याचा प्रयत्न; झटापटीत रायफलीतून चुकून गोळी सुटली

पुणे : शिवाजीनगर मुख्यालयात ड्युटीवर असलेल्या कर्मचाऱ्याने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्यानंतर त्याला वाचवण्यास गेलेल्या कर्मचाऱ्याला गोळी लागल्याची धक्कादायक प्रकार घडला. जखमी पोलीस कर्मचारी बेंडाळे यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बेंडाळे आणि पोलिस शिपाई सस्ते हे शिवाजीनगर मुख्यालयात नेमणुकीस आहेत. क्वार्टर गेट येथे बेंबळा, सस्ते आणि एक महिला कर्मचारी रात्रपाळीला ड्युटीवर होते. यावेळी सस्ते व महिला कर्मचारी यांच्यात वाद झाले. वादात सस्ते यांनी ताणावाखाली येऊन स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. पण हा प्रकार लक्षात येताच बेंडाळे यांनी त्यांना अडविले. अडवत असताना झालेल्या झटापटीत रायफलीतून चुकून गोळी सुटली आणि बेंडाळे यांना लागली. यात बेंडाळे जखमी झाले आहेत. त्यांना ससून रुग्णालयात नेण्यात आले आहे.

या घटनेची माहिती मिळताच शिवाजीनगर मुख्यालयाच्या पोलीस उपायुक्त स्वप्ना गोरे यांनी घटनास्थळी धाव घेतली. ड्युटीवर असताना महिला कर्मचाऱ्याशी वाद झाल्यानंतर मानसिक तणावातून हा प्रकार घडला आल्याचे सांगण्यात येत आहे.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

स्वातंत्र्यदिनानिमित्त डॉ. सोमनाथ गिते यांचा महापौरांच्या हस्ते गौरव

पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…

3 आठवडे ago

लग्न ठरलेल्या प्रियकरासोबत तरुणीचा संशयास्पद मृत्यू; आईचा गंभीर आरोप

बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…

4 आठवडे ago

चार महिन्यांपूर्वीचा नवाकोरा रस्ता ऑप्टिकल फायबरसाठी फोडला; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांचा संताप; काम बंद पाडून अधिकाऱ्यांना जाब

नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…

4 आठवडे ago

‘उघडलेले पुस्तक’ पॅनेलचा दणदणीत विजय; सर्व १५ उमेदवार विजयी; सर्व प्रवर्गांत परिवर्तन आणि सुशासन पॅनेलला यश

पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…

4 आठवडे ago

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

3 महिने ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

3 महिने ago