Government of Maharashtra
मुंबई : नागरी संरक्षण दलाने आतापर्यंत अनेक नैसर्गिक व मानवनिर्मित आपत्तीच्या वेळी राज्य व राज्याबाहेर विमोचन व मदतकार्य केलेले आहे. नागरी संरक्षण दलाची व्याप्ती नागरी संरक्षण शहरापुरती मर्यादित न ठेवता वाढविण्याचे धोरण आहे. आपत्कालीन उपाययोजनेच्या दृष्टीकोनातून मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, रायगड व पालघर या सहा नागरी संरक्षण जिल्ह्यांमध्ये नागरी संरक्षण स्वयंसेवकांची नोंदणी व पुनर्नोंदणी प्रक्रिया सुरू करण्यात आली असल्याची माहिती नागरी संरक्षण संचालनालयाचे संचालक यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.
नागरी संरक्षण दलामध्ये सामील होऊन देशसेवा करण्याची इच्छा असलेल्या नागरिकांनी मोठ्या प्रमाणात नोंदणी व पुनर्नोंदणी करावी असे आवाहन नागरी संरक्षण संचालनालयामार्फत करण्यात आले आहे.
राज्यातील मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, रायगड व पालघर या नागरी संरक्षण जिल्ह्यांमध्ये नागरी संरक्षण स्वयंसेवकांची नोंदणी व पुनर्नोंदणी प्रक्रिया पुन्हा सुरु केली आहे. तरी, ज्या नागरिकांना नागरी संरक्षण दलामध्ये स्वयंसेवक म्हणून सदस्य व्हावयाचे आहे त्यांनी या विभागाची वेबसाईट http://maharashtracdhg.gov.in वर भेट द्यावी नागरी संरक्षण स्वंयसेवक नोंदणी व पुनर्नोंदणी फॉर्मस दिलेल्या अटी, शर्तीसह डाऊनलोड करुन घ्यावेत. नोंदणी / पुनर्नोंदणी फॉर्म भरुन आपल्या क्षेत्रातील संबंधित नागरी संरक्षण कार्यालयाशी संपर्क साधून स्वतः सादर करावेत आणि पुढील प्रक्रियेबाबतची माहिती घ्यावी. स्वयंसेवक म्हणून आपले योगदान देशसेवेसाठी द्यावे, असे आवाहन नागरी संरक्षण संचालनालयामार्फत करण्यात आले आहे.
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…
मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…
पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…
मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…
पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…