Anna Hazare in court against clean chit in Shikhar Bank case
मुंबई : महाराष्ट्र राज्य सहकारी बँक (शिखर बँक) घोटाळा प्रकरणात उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मिळालेल्या क्लीन चिटला ज्येष्ठ समाज सेवक अण्णा हजारे यांनी विरोध केला आहे. या प्रकरणातील अतिरिक्त क्लोजर रिपोर्टला अण्णा हजारे कोर्टात आव्हान देणार आहेत. पोलिसांच्या अतिरिक्त क्लोजर रिपोर्टवर अण्णा हजारे आणि माणिकराव जाधव यांच्या वकिलांनी आक्षेप घेतला आहे. कोर्टाने हा आक्षेप मान्य करत याचिका दाखल करण्यास वेळ दिला आहे. २९ जूनला या प्रकरणी पुढची सुनावणी होणार आहे.
शिखर बँक कर्ज घोटाळा प्रकरणात मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने (ईओडब्ल्यू) आपली भूमिका बदलून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्यासह अनेक आरोपी नेत्यांना क्लीन चीट दिली आहे. २५ हजार कोटी रुपयांच्या कथित शिखर बँक घोटाळ्या प्रकरणी अजित पवार, त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार आणि इतर आरोपींना मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेनं दिलासा देताना कोणतेच पुरावे नसल्याचं म्हटलें होतं. ऐन लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर अजितदादांना सपत्नीक क्लीन चिट मिळाल्याने राजकीय वर्तुळातून त्याचे पडसाद उमटले होते.
दरम्यान, सत्ताधाऱ्यांकडून तपाससंस्थांचा निव्वळ वापर केला जात आहे. अन्य पक्षांच्या राजकीय नेत्यांना आपल्याकडे ओढण्यासाठी सत्ताधाऱ्यांच्या दबावामुळे तपास संस्थांना आपली भूमिकाही बदलावी लागत आहे. अजित पवार यांच्या बाबतीत ईओडब्ल्यू व सक्तवसुली संचालनालय (ईडी) यांच्या वर्तणुकीत तेच दिसून आले आहे. त्यामुळे या गंभीर प्रकरणाचा तपास राज्य किंवा केंद्रीय तपास संस्थांकडून पारदर्शकपणे होईल, असे चित्र दिसत नाही. म्हणून या प्रकरणाचा तपास उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्तींच्या नेतृत्वाखालील विशेष तपास पथकाकडेच (एसआयटी) देणे आवश्यक आहे. त्या एसआयटीमध्ये अत्यंत प्रामाणिक व सचोटीचे पोलिस अधिकारी असणे आवश्यक आहे,’ असे म्हणणे मूळ तक्रारदार सुरींदर अरोरा व याचिकाकर्ते माणिक जाधव यांनी ज्येष्ठ वकील सतीश तळेकर व अॅड. माधवी आय्यपन यांच्यामार्फत सुधारित याचिकेद्वारे मांडले आहे. आपल्या विनंतीच्या समर्थनार्थ त्यांनी याचिकेत राजकीय व न्यायालयीन घटनाक्रमही दाखवला आहे.
मुंबई : भारतीय हवामान खात्याच्या (आयएमडी) दिनांक २० एप्रिल २०२६ रोजी जाहीर केलेल्या पाच दिवसीय…
शिबलापूर : समाजहिताची जाणीव जपत आणि शिक्षणाला हातभार लावण्याच्या उद्देशाने, महाराष्ट्र शासनाकडून प्रदान करण्यात आलेल्या…
बीड : बीड जिल्ह्यात एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. परळी तालुक्यातील…
मुंबई : देशातील हवामानात पुन्हा एकदा मोठे चढउतार पाहायला मिळत आहेत. हवामान विभागाने दिलेल्या ताज्या…
नाशिक : नाशिक जिल्ह्यातील निफाड परिसरात बेपत्ता झालेल्या एका परिचारिकेचा मृतदेह २४ दिवसांनी विहिरीत सापडल्याने…
नागपूर : ज्येष्ठ नेते व माजी मंत्री दत्ताभाऊ मेघे यांच्या निधनाचे वृत्त समजताच विदर्भात शोककळा…