महाराष्ट्र

तळोजा एमआयडीसीतील भूखंड विभाजन प्रकरणी चौकशी करून अहवाल सादर करावा – विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे

मुंबई : तळोजा एमआयडीसीतील भूखंड विभाजन प्रकरणाची चौकशी करून १५ दिवसात अहवाल सादर करावा, असे निर्देश विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी दिले.

विधानभवनात तळोजा एमआयडीसी येथील ए-३ भूखंड तक्रारीसंदर्भात आढावा बैठक झाली. यावेळी गृह विभागाचे कक्ष अधिकारी हेमंतकुमार मोहन, पोलीस निरीक्षक संजय पाटील, उद्योग विभागाचे अवर सचिव किरण जाधव, एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी, महादेव इम्पेक्सचे प्रतिनिधी व तक्रारदार उपस्थित होते.

तळोजा एमआयडीसी येथील ए-३ या भूखंडाबाबत महादेव इम्पॅक्ट्स् कंपनीने नियमांचे उल्लंघन करत अवैधरित्या भूखंडाचे विभाजन करून इतर उद्योजकांना विक्री केल्याची तक्रार आहे. नियमानुसार उद्योग सुरू झाल्यानंतर व तो बंद पडल्यासच भूखंड विभाजनाची तरतूद आहे, मात्र संबंधित उद्योगाने कोणताही उद्योग सुरू न करता थेट भूखंड विभाजन करून विक्री केली. या प्रकरणात एमआयडीसीमार्फत सखोल चौकशी करुन १५ दिवसांत अहवाल सादर करण्याचे निर्देश अण्णा बनसोडे यांनी दिले.

या चौकशी पथकामध्ये पोलीस आयुक्त, नवी मुंबई यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस आयुक्त कार्यालयातील वरिष्ठ अधिकारी, एमआयडीसीचे वरिष्ठ अधिकारी आणि प्रांत अधिकारी, पनवेल यांचा समावेश केला जाणार आहे.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

6 दिवस ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

6 दिवस ago

पुण्यात विषारी दारू प्यायल्याने १२ जणांचा मृत्यू, दोषींवर कठोर कारवाईचे आदेश

मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…

6 दिवस ago

व्यसनमुक्ती क्षेत्रातील अविरत समाजकार्याची दखल; डॉ. सोमनाथ गिते यांचा मा. माधुरीताई मिसाळ यांच्या हस्ते सत्कार

पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…

2 आठवडे ago

भरतीच्या बोगस जाहिरातींपासून सावध राहण्याचे आवाहन

मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…

2 आठवडे ago

पुण्यात उष्णतेचा कहर! IMD चा यलो अलर्ट जारी; नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन

पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…

3 आठवडे ago