अमरावती

नागपूर-औरंगाबाद महामार्गावर दोन ट्रक धडकल्याने भीषण अपघात, चौघांचा जागीच मृत्यू

अमरावती : नागपूर-औरंगाबाद महामार्गावर दोन ट्रक समोरासमोर धडकल्याने भीषण अपघात झाला आहे. या अपघातात चार जणांचा मृत्यू झाला आहे. गुरुवारी मध्यरात्री 12 ते 1 दरम्यान अमरावती जिल्ह्यातील शिंगणापूर चौफुली समोर दोन ट्रकची समोरासमोर धडक झाली. नागपूर अमरावती महामार्गावर लोखंडी रॉड घेऊन जाणारा ट्रक खड्डे वाचवण्याच्या नादात अनियंत्रित झाला आणि औरंगाबादहून नागपूरकडे कांदे वाहून नेणाऱ्या ट्रकला धडकला.

अनियंत्रित ट्रक समोरून येणाऱ्या ट्रकवर धडकल्याने दोन्ही ट्रक मधील ड्रायव्हर व क्लिनर यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. हा अपघात एवढा भीषण होता की दोन्हीही ट्रकच्या पुढील भागाचा अक्षरशः चेंदामेंदा झाला असून ट्रक मधील लोखंडी रॉड चालक आणि वाहकाच्या शरीरातून आरपार गेले आणि काचेतून बाहेर आले. या दोन्ही ट्रकच्या चालक आणि वाहक अशा चौघांचा जागीच मृत्यू झाला आहे. ट्रकमधील चालक – वाहक दोघांचे मृतदेह ट्रकमध्ये अडकले होते. त्यांना काढण्यासाठी अमरावती महानगरपालिकांचे वाहन व अग्निशमन दलाच्या पथकाला बोलावण्यात आले होते.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

स्वातंत्र्यदिनानिमित्त डॉ. सोमनाथ गिते यांचा महापौरांच्या हस्ते गौरव

पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…

3 आठवडे ago

लग्न ठरलेल्या प्रियकरासोबत तरुणीचा संशयास्पद मृत्यू; आईचा गंभीर आरोप

बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…

4 आठवडे ago

चार महिन्यांपूर्वीचा नवाकोरा रस्ता ऑप्टिकल फायबरसाठी फोडला; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांचा संताप; काम बंद पाडून अधिकाऱ्यांना जाब

नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…

1 महिना ago

‘उघडलेले पुस्तक’ पॅनेलचा दणदणीत विजय; सर्व १५ उमेदवार विजयी; सर्व प्रवर्गांत परिवर्तन आणि सुशासन पॅनेलला यश

पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…

1 महिना ago

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

3 महिने ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

3 महिने ago