अमरावती

ग्रामीण भागातील रस्त्यांची सुधारणा कामे त्वरित पूर्ण करा – पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर

अमरावती : जिल्ह्याचा विकास करताना मुख्यतः ग्रामीण भाग स्वयंपूर्ण होणे गरजेचे आहे. यासाठी ग्रामीण भागातील रस्त्यांची सुधारणा कामे त्वरित पूर्ण करून ग्रामविकासाला चालना देण्याची सूचना पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी आज दिली.

जिल्ह्यातील गावागावांना जोडणाऱ्या अनेक ग्रामीण रस्त्यांच्या सुधारणा कामांचे भूमीपूजन पालकमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी त्या बोलत होत्या. 654 कोटी 25 लाख रुपयांच्या विकासकामांचे भूमीपूजन यावेळी करण्यात आले. शिरजगाव कसबा, थुंगाव, पिंप्री ,वायंगाव ,खारतळेगाव, भातकुली, गणोजादेवी येथील रस्त्यांच्या सुधारणा करण्याच्या कामाचे भूमीपूजन पालकमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. या विकास कामाची किंमत 130 लाख रुपये आहे. येथील विर्शी ,वायगाव रस्त्याच्या सुधारणा कामाचेही भूमीपूजन करण्यात आले. या विकास कामासाठी 200 लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे.

टाकरखेडा ,पुसदा ,रोहणखेडा ,माहुली जहांगीर रस्त्याची पुलासह सुधारणा करण्यात येणार आहे. हा रस्ता 69 किलोमीटरचा आहे. या दुरुस्ती कामासाठी 100 लाख रुपये उपलब्ध करून देण्यात आले आहे. याचेही भूमीपूजन यावेळी करण्यात आले. तळवेल, साऊर, टाकरखेडा, आष्टी, वायगांव ,खारतळेगाव या रस्त्याची लांबी 23 किलोमीटर असून यासाठी 150 लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. या रस्त्याच्या सुधारणा कामाचेही भूमीपूजन यावेळी करण्यात आले.

साऊर येथील जिल्हा परिषद मराठी शाळा आणि जिल्हा परिषद उर्दू शाळा वर्ग खोल्यांच्या बांधकामाचे भूमिपूजन यावेळी करण्यात आले. या बांधकामासाठी 28 .50 लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. तसेच येथील मूलभूत सुविधा निधीअंतर्गत काँक्रिट रस्त्याच्या बांधकामाचेही भूमीपूजन करण्यात आले आहे. या कामासाठी 15 लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे.

त्याचप्रमाणे मौजा गोपाळपूर येथील पेढी नदीवरील पूर संरक्षणाच्या कामाचे भूमीपूजन करून पालकमंत्र्यांनी पुलाची प्रत्यक्ष पाहणी केली. या विकास कामासाठी 30.75 लाख रुपयांचा निधी उपलब्ध करुन देण्यात आला आहे. विकास कामे त्वरित पूर्ण करण्याचे सूचना श्रीमती ठाकूर यांनी यावेळी संबंधितांना दिल्या.

जिल्हा परिषद सदस्य जयंत देशमुख, तहसीलदार नीता लबडे, नायब तहसीलदार विजय मांजरे, उपअभियंता अनिल तसेच सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते .

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

स्वातंत्र्यदिनानिमित्त डॉ. सोमनाथ गिते यांचा महापौरांच्या हस्ते गौरव

पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…

3 आठवडे ago

लग्न ठरलेल्या प्रियकरासोबत तरुणीचा संशयास्पद मृत्यू; आईचा गंभीर आरोप

बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…

4 आठवडे ago

चार महिन्यांपूर्वीचा नवाकोरा रस्ता ऑप्टिकल फायबरसाठी फोडला; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांचा संताप; काम बंद पाडून अधिकाऱ्यांना जाब

नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…

4 आठवडे ago

‘उघडलेले पुस्तक’ पॅनेलचा दणदणीत विजय; सर्व १५ उमेदवार विजयी; सर्व प्रवर्गांत परिवर्तन आणि सुशासन पॅनेलला यश

पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…

4 आठवडे ago

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

3 महिने ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

3 महिने ago