महाराष्ट्र

उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाच्या लालसेपोटी आमच्यासोबतच नाही, तर महाराष्ट्राच्या जनतेशीही विश्वासघात केला – अमित शाह

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजपाच्या नेतृत्वाखालील महायुतीला ऐतिहासिक विजय मिळाला आहे. या विजयानंतर राज्यात स्थापन झालेल्या सरकारमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री म्हणून, तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. आज (रविवारी) नागपूरमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारचा विस्तार होणार आहे. परंतु, किती मंत्र्यांचा शपथविधी होणार आणि घटक पक्षांना किती मंत्रीपदे मिळणार याबद्दल अद्याप स्पष्टता आलेली नाही.

दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपाचे दिग्गज नेते अमित शाह यांनी इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीत विधानसभा निवडणुकीतील विजय आणि शिवसेनेचे नेते, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नाराजीवर भाष्य केले आहे.

अमित शाह म्हणाले, “महाविकास आघाडीने लोकसभा निवडणुकीत १०५ जागा जिंकल्या होत्या, मात्र महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीला विजय मिळाला आहे. तुमच्या विश्लेषणाचा आधार चुकीचा आहे. गेल्या निवडणुकीतदेखील नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांना बहुमत मिळालं होतं. शिवसेना ज्या जागांवर लढली त्या जागा आम्ही लढल्या नव्हत्या, त्यामुळे आम्ही जिंकू शकत नव्हतो. शिवसेना आमच्याबरोबर होती, त्यामुळे त्यांना बहुमत मिळालं होतं. आम्हाला संपूर्ण बहुमत मिळालं. मुख्यमंत्री बनण्याच्या लालसेपोटी उद्धव ठाकरे यांनी आमच्याशी विश्वासघात केला आणि महाराष्ट्राच्या जनतेशीही विश्वासघात केला.”

पुढे बोलताना अमित शाह म्हणाले, “उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने आमच्याबरोबर विश्वासघात केला, जनतेने ते लक्षात ठेवले. त्यानंतर अडीच वर्षांत सरकारने केलेल्या विकासकामांमुळे आणि मोदी सरकारच्या गेल्या १० वर्षांच्या सकारात्मक कामकाजाच्या जोरावर महायुतीला हा प्रचंड विजय मिळाला.”

राज्यात स्थापन झालेल्या महायुतीच्या सरकारमध्ये माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काहीसे नाराज असल्याची चर्चा सुरू आहे. याबाबत विचारले असता अमित शाह म्हणाले, “एकनाथ शिंदे नाराज असण्याचं काही कारण नाही. आमच्या जागा खूप जास्त आहेत. मागील वेळीही आमच्या जागा जास्त होत्या, पण आम्ही एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री बनवले आणि अडीच वर्ष त्यांच्याबरोबर खंबीरपणे उभे राहिलो. यावेळी आम्ही सुरुवातीपासूनच सांगितले होते की, मुख्यमंत्री कोण असतील हे निवडणुकीनंतर निश्चित केले जाईल. त्यामुळे कोणीही नाराज होण्याची आवश्यकता नाही. कोणी नाराज नाही.”

मंत्रिमंडळ विस्तारास होणाऱ्या उशीराबद्दल अमित शाह म्हणाले, “आम्हाला काही अडचण येत नाही. सर्वकाही नियोजित कार्यक्रमानुसार चालू आहे. महाविकास आघाडीचे सरकार असताना जे घडत होते, त्यापेक्षा आम्ही तीन-तीन दिवस पुढे आहोत.”

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Share
Published by
थोडक्यात घडामोडी टीम

Recent Posts

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

1 महिना ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

1 महिना ago

पुण्यात विषारी दारू प्यायल्याने १२ जणांचा मृत्यू, दोषींवर कठोर कारवाईचे आदेश

मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…

1 महिना ago

व्यसनमुक्ती क्षेत्रातील अविरत समाजकार्याची दखल; डॉ. सोमनाथ गिते यांचा मा. माधुरीताई मिसाळ यांच्या हस्ते सत्कार

पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…

2 महिने ago

भरतीच्या बोगस जाहिरातींपासून सावध राहण्याचे आवाहन

मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…

2 महिने ago

पुण्यात उष्णतेचा कहर! IMD चा यलो अलर्ट जारी; नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन

पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…

2 महिने ago