Ajit Pawar's order to remove the encroachment that caused the situation
पुण्यात झालेल्या अतिवृष्टीने इंदापूर तालुक्यातील अनेक गावांमध्ये महापूर सदृश्य परिस्थिती तयार झाली होती. यामुळे शेतीसह राहत्या घरांचे व्यवसायिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. लोकांच्या घरात पाणी घुसले. गावात पाणी शिरल्याचे मुख्य कारण गावातील ओढ्या नाल्यात झालेले अतिक्रमण असल्याचे लक्षात आले.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज बारामती शहरासह तालुक्यातील अतिवृष्टी आणि पुरामुळे बाधित झालेल्या भागांची पाहणी केली. पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे निर्देश दिले. स्थानिकांशी संवाद साधला. पुरामुळे बाधित झालेल्या रस्ते-पुलांच्या दुरुस्तीची कामं तातडीनं करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
अजित पवार सोलापूर दौर्यावर जात असताना इंदापूर तालुक्यातील निमगाव केतकीतील याच अतिक्रमणाने पीडित असलेल्या ओढ्यावर थांबले. हे अतिक्रमण पाहताच ते संतापले दादांनी थेट तिथे उपस्थित असणाऱ्या प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे तसेच तहसीलदार यांना या ओढ्यावरील अतिक्रमण तात्काळ काढण्याचे आदेश दिले. अजित पवार यांच्या आदेशानंतर प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांनी सांगितले की निमगाव केतकी येथील ओढ्याची हद्द निश्चित करून त्यावरील अतिक्रमणे तातडीने काढणार आहे.
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…
मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…
पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…
मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…
पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…