Ajit Pawar's heartfelt tribute to CRPF jawan Ashok Ingwale
मुंबई : पंजाबमध्ये कर्तव्य बजावताना वीरमरण आलेल्या बारामती तालुक्यातील सोनगावचे सुपुत्र, ‘सीआरपीएफ’ जवान अशोक इंगवले यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी श्रद्धांजली वाहिली आहे. “तीन वर्षांपूर्वी १७ फेब्रुवारी २०१९ ला माझी आणि अशोकची भेट झाली होती. त्यावेळी त्याने पुलवामा दहशतवादी हल्ल्यातील शहीद जवानांबद्दलच्या आठवणी सांगितल्या होत्या. त्याच्यासोबतची ती भेट आजही स्मरणात आहे. आज अशोकला वीरमरण आल्याचे समजून धक्का बसला व अतीव दुःख झाले. त्याच्या आठवणी कायम स्मरणात राहतील.
महाराष्ट्राच्या मातीला शौर्याची, धैर्याची, पराक्रमाची, बलिदानाची गौरवशाली परंपरा आहे. देशसेवेची ही परंपरा कायम राखत वीर जवान अशोक इंगवले यांनी देशाची एकता, अखंडता आणि लोकशाहीचे रक्षण करत असताना प्राणार्पण केले. देशाची सेवा बजावताना त्यांनी केलेल्या त्यागास, बारामतीच्या वीर सुपुत्रास सलाम,” अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वीर जवान अशोक इंगवले यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे.
पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…
बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…
नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…
पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…