महाराष्ट्र

दर्जेदार आरोग्य सुविधांसाठी ‘एआय तंत्रज्ञान’ उपयुक्त – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई : स्टॅनफोर्ड विद्यापीठाचे औषधनिर्माण विभागाचे प्राध्यापक डॉ. अनुराग मैरल यांनी वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ या नावीन्यपूर्ण तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करुन राज्याच्या आरोग्य व्यवस्थेच्या बळकटीकरणासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याची तयारी डॉ. मैरल यांनी यावेळी दर्शविली.

राज्यभरातील नागरिकांना आरोग्य सुविधा देण्यासाठी आरोग्य संस्थांमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आवश्यक आहे. राज्य शासनाच्या माध्यमातून राज्यात सुमारे ७०० बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना सुरू करण्यात येत आहेत. आपला दवाखान्यातील सुविधांसाठी एआय तंत्रज्ञानाचा वापर केल्यास नागरिकांना घराजवळच दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध होईल शकतील. त्यामुळे मोठ्या रुग्णालयांमध्ये होणाऱ्या गर्दीचे व्यवस्थापन होऊ शकेल, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

राज्यातील शेवटच्या व्यक्तीपर्यंत आरोग्यसेवा पोहचविण्यासाठी एआय तंत्रज्ञान उपयुक्त ठरेल, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. डॉ. मैरल हे स्टॅनफोर्ड विद्यापीठाच्या ग्लोबल आऊटरिच प्रोग्रामचे संचालक असून मुख्यमंत्री आणि डॉ. मैरल यांच्यात वैद्यकीय क्षेत्र, औषधनिर्मितीसह सामान्य जनतेला आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे दर्जेदार, अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा पुरविण्याच्या विषयावर यावेळी चर्चा करण्यात आली.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

4 आठवडे ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

4 आठवडे ago

पुण्यात विषारी दारू प्यायल्याने १२ जणांचा मृत्यू, दोषींवर कठोर कारवाईचे आदेश

मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…

4 आठवडे ago

व्यसनमुक्ती क्षेत्रातील अविरत समाजकार्याची दखल; डॉ. सोमनाथ गिते यांचा मा. माधुरीताई मिसाळ यांच्या हस्ते सत्कार

पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…

1 महिना ago

भरतीच्या बोगस जाहिरातींपासून सावध राहण्याचे आवाहन

मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…

1 महिना ago

पुण्यात उष्णतेचा कहर! IMD चा यलो अलर्ट जारी; नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन

पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…

1 महिना ago