अहिल्यानगर

महाराष्ट्र समृद्धी महामार्गावरील कोपरगाव तालुक्यातील गावांच्या समस्यांचा राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी घेतला आढावा

अहमदनगर : महाराष्ट्र समृद्धी महामार्ग हा शासनाचा महत्त्वाचा प्रकल्प असून दर्जाच्या दृष्टीने देशातील सर्वोत्तम प्रकल्प ठरणार आहे. या प्रकल्पामुळे कोपरगाव तालुक्यातील गावांमधील रहिवाशांना जाणवणाऱ्या समस्यांचा सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी मंत्रालयात झालेल्या बैठकीत आढावा घेतला. या समस्या सोडविण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी स्थानिक लोकप्रतिनिधी, संबंधित अधिकारी, कंत्राटदार तसेच स्थानिक रहिवाशांसमवेत स्थळ पाहणी करावी आणि समस्यांचे तातडीने निराकरण करावे, असे निर्देश त्यांनी यावेळी दिले.

‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाचे नागपूर ते मुंबईपर्यंतचे बांधकाम निरनिराळ्या 16 टप्प्यांमध्ये सुरू आहे. त्यापैकी अहमदनगर जिल्ह्याच्या कार्यक्षेत्रातील टप्प्याअंतर्गत कोपरगाव तालुक्यातील एकूण 10 गावांचा या प्रकल्पात समावेश आहे. या गावांतील रहिवाशांच्या अडचणींचा आढावा घेण्यासाठी आयोजित या बैठकीस आमदार आशुतोष काळे, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे मुख्य अभियंता एस. के. सुरवसे, अधीक्षक अभियंता व्ही. आर. सातपुते यांच्यासह संबंधित अधिकारी, कंत्राटदार आणि संबंधित गावांतील रहिवासी उपस्थित होते.

उपरोक्त कामाच्या कोपरगाव तालुक्यातील टप्प्यात रस्त्यापेक्षा लगतची जमीन खोल असणे, विजेची तार जळून वीज बंद होणे, सर्विस रोड, बैलगाडी रस्ता तयार करणे, आरोग्य उपकेंद्राची इमारत बांधणे अशा विविध समस्यांबाबत बनसोडे यांच्या उपस्थितीत चर्चा करण्यात आली. रहिवाशांना वापरण्याजोगे रस्ते तयार करून देण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

स्वातंत्र्यदिनानिमित्त डॉ. सोमनाथ गिते यांचा महापौरांच्या हस्ते गौरव

पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…

3 आठवडे ago

लग्न ठरलेल्या प्रियकरासोबत तरुणीचा संशयास्पद मृत्यू; आईचा गंभीर आरोप

बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…

4 आठवडे ago

चार महिन्यांपूर्वीचा नवाकोरा रस्ता ऑप्टिकल फायबरसाठी फोडला; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांचा संताप; काम बंद पाडून अधिकाऱ्यांना जाब

नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…

4 आठवडे ago

‘उघडलेले पुस्तक’ पॅनेलचा दणदणीत विजय; सर्व १५ उमेदवार विजयी; सर्व प्रवर्गांत परिवर्तन आणि सुशासन पॅनेलला यश

पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…

1 महिना ago

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

3 महिने ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

3 महिने ago