अहिल्यानगर

कोपरगाव ग्रामीण पोलीस स्टेशन आणि पोलीस वसाहतीला मंजुरी, २५ कोटी रुपयांचा निधी देणार

शिर्डी : कोपरगाव ग्रामीण पोलीस स्टेशन आणि पोलीस वसाहतीला मंजुरी दिली असून त्यासाठी पंचवीस कोटी रुपयांचा निधी देण्यात येणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री तथा वित्त मंत्री अजित पवार यांनी आज कोपरगाव येथे केली. कोपरगाव येथे पंचायत समितीच्या नवीन इमारतीचे उद्घाटन केल्यानंतर या इमारतीच्या आवारात उभारण्यात आलेल्या कर्मवीर शंकरराव काळे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण आज अजित पवार यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते.

उपमुख्यमंत्री तथा वित्त मंत्री अजित पवार म्हणाले, मागील दोन वर्षाच्या काळातील कोरोना संकटावर सर्वांच्या सहकार्याने मात केली असून, कोरोना संकट पुन्हा येऊ नये यासाठी शासन जागरुक आहे. राज्याच्या सर्वांगिण विकासासाठी अर्थसंकल्पात इन्फ्रास्ट्रक्चर निर्मितीसाठी सुमारे 1 लाख 25 हजार कोटी रुपये तरतुदीचा पंचसूत्री कार्यक्रम निश्चित करण्यात आला आहे. कोरोना संकटात आर्थिक अडचणींवर मात करुन विकास कामांसाठी मोठ्या प्रमाणावर शासनाने निधी उपलब्ध करुन दिला आहे.

राजकीय, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रामध्ये अहमदनगर जिल्हा अग्रेसर आहे. या जिल्ह्याच्या विकासामध्ये कर्मवीर शंकरराव काळे यांचे योगदान मोठे आहे. कर्मवीर शंकरराव काळे यांचा पूर्णाकृती पुतळा कोपरगावकरांना प्रेरणादायी ठरेल तसेच नागरिकांनी त्यांच्या विचारांचा वारसा पुढे न्यावा, असे आवाहन पवार यांनी केले.

कोपरगाव शहराच्या विकासासाठी नदी संवर्धन, रस्ते विकास तसेच बस स्थानक परिसरात बीओटी तत्त्वावर व्यापारी गाळे उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. डासमुक्त आणि आरोग्याच्यादृष्टीने स्वच्छ कोपरगावसाठी भुयारी गटार योजनेचा प्रस्ताव त्वरित सादर करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी प्रशासनाला केल्या. येत्या महाराष्ट्र दिनी नागपूर-मुंबई बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचा पहिला टप्पा सुरु करण्याबाबत नियोजन करण्यात येत असल्याचे सांगितले. कोपरगावच्या विकासासाठी सुमारे एक हजार कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचे लोकार्पण यावेळी पवार यांच्याहस्ते करण्यात आले. या विकास कामांमुळे कोपरगावचा चेहरा मोहरा बदलेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

पोलीस स्टेशनच्या नूतन इमारतीचे उद्घाटन

कोपरगाव येथे चार कोटी रुपये खर्चून बांधण्यात आलेल्या अत्याधुनिक सोयींनी परिपूर्ण असलेल्या पोलीस स्टेशन इमारतीचे उद्घाटन उपमुख्यमंत्री तथा वित्त मंत्री अजित पवार यांच्याहस्ते आज झाले. यावेळी गृह मंत्री दिलीप वळसे पाटील, पालकमंत्री हसन मुश्रीफ, आमदार आशुतोष काळे, जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील, कोपरगावचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक वासुदेव देसले, पोलीस विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. उद्घाटनानंतर इमारतीमधील विविध विभागांच्या दालनांची मान्यवरांनी पाहणी केली.

बस स्थानकाच्या आणि पंचायत समितीच्या नूतन इमारतीचे उद्धाटन

कोपरगाव येथे पाच कोटी रुपये खर्चून बांधण्यात आलेल्या अत्याधुनिक सोयींनी परिपूर्ण असलेल्या बस स्थानक इमारतीचे तसेच चार कोटी रुपये खर्चून बांधण्यात आलेल्या पंचायत समिती इमारतीचे उद्घाटन उपमुख्यमंत्री तथा वित्त मंत्री अजित पवार यांच्याहस्ते आज झाले. यावेळी गृह मंत्री दिलीप वळसे पाटील, पालकमंत्री हसन मुश्रीफ, आमदार आशुतोष काळे, संबधित विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. उद्घाटनानंतर इमारतीमधील विविध विभागांच्या दालनांची मान्यवरांनी पाहणी केली.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

4 आठवडे ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

4 आठवडे ago

पुण्यात विषारी दारू प्यायल्याने १२ जणांचा मृत्यू, दोषींवर कठोर कारवाईचे आदेश

मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…

4 आठवडे ago

व्यसनमुक्ती क्षेत्रातील अविरत समाजकार्याची दखल; डॉ. सोमनाथ गिते यांचा मा. माधुरीताई मिसाळ यांच्या हस्ते सत्कार

पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…

1 महिना ago

भरतीच्या बोगस जाहिरातींपासून सावध राहण्याचे आवाहन

मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…

1 महिना ago

पुण्यात उष्णतेचा कहर! IMD चा यलो अलर्ट जारी; नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन

पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…

1 महिना ago