अहिल्यानगर

धक्कादायक : ग्रामपंचायत सदस्यावर गोळीबार, पाच गोळ्या झाडून हल्लेखोर पसार

अहमदनगर : नेवासा तालुक्यात बऱ्हाणपूर ग्रामपंचायत सदस्यावर पाच गोळ्या झाडल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मंगळवारी रात्री ही घटना घडली असून त्यामध्ये हा तरुण गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर नगरच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हल्लेखोर पळून गेले असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, बऱ्हाणपूर ग्रामपंचायतीचे सदस्य संकेत चव्हाण मंगळवारी रात्री नऊच्या सुमारास कांगोणी फाट्यावरून बऱ्हाणपूरकडे जात होते. त्यावेळी ते रस्त्यात एका ठिकाणी लघुशंका करण्यासाठी थांबले असता दुचाकीवरून आलेल्या दोन हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. चव्हाण यांच्या पोटावर, हातावर, पायावर गोळ्या लागल्या आहेत. गोळ्या झाडल्यानंतर हल्लेखोर पळून गेले. त्यानंतर चव्हाण यांना तातडीने नगरच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे त्यांच्यावर उपचार केले जात आहेत.

संकेत चव्हाण यांच्यावर उपचार करणारे डॉ. सतीश सोनवणे यांनी सांगितले की, “चव्हाण यांच्या शरीरातून तीन गोळ्या काढण्यात आल्या आहेत. काही गोळ्या हाडांना छेदून गेल्या आहेत. काही गोळ्या लागून गेल्याच्या जखमा त्यांच्या शरीरावर आहेत. त्याच्यावर योग्य ते उपचार करून शस्त्रक्रिया करण्यासाठी चार तास लागले. रुग्णाला वेळेत उपचार मिळाले असून त्यांची प्रकृती स्थिर आहे.”

दरम्यान, याप्रकरणी शनिशिंगणापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करीत आहेत. हा हल्ला कोणी आणि का केला? याबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

स्वातंत्र्यदिनानिमित्त डॉ. सोमनाथ गिते यांचा महापौरांच्या हस्ते गौरव

पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…

1 दिवस ago

लग्न ठरलेल्या प्रियकरासोबत तरुणीचा संशयास्पद मृत्यू; आईचा गंभीर आरोप

बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…

6 दिवस ago

चार महिन्यांपूर्वीचा नवाकोरा रस्ता ऑप्टिकल फायबरसाठी फोडला; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांचा संताप; काम बंद पाडून अधिकाऱ्यांना जाब

नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…

1 आठवडा ago

‘उघडलेले पुस्तक’ पॅनेलचा दणदणीत विजय; सर्व १५ उमेदवार विजयी; सर्व प्रवर्गांत परिवर्तन आणि सुशासन पॅनेलला यश

पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…

1 आठवडा ago

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

3 महिने ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

3 महिने ago