Advertisement published for 8500 posts in the state health department
मुंबई : राज्याच्या आरोग्य विभागाने मेगाभरती जाहीर करत 8500 जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. ही जाहिरात रिक्त असलेल्या एकूण 17 हजार पदांपैकी 50 टक्के पदांसाठी आहे. यासाठी पुढच्या महिन्यात 28 फेब्रुवारी रोजी एकाच दिवशी परीक्षा घेण्यात येणार आहेत.
या पदभरतीचा तपशील आरोग्य विभागाच्या संकेत स्थळावर उपलब्ध आहे. या परीक्षेसाठी फेब्रुवारी 2019 मध्ये महापोर्टलच्या माध्यमातून अर्ज मागवले होते. त्यामुळे आता जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर त्या उमेदवारांना पुन्हा नव्याने अर्ज करायची गरज नसल्याचं सांगण्यात येत आहे.
एसईबीसी उमेदवार हे आर्थिक दुर्बल प्रवर्गाचा लाभ घेऊ शकतात, असे सरकारच्या वतीनं स्पष्ट करण्यात आलं आहे.
आरोग्य विभागाची भरतीची जाहिरात :
स्वतंत्रपणे विभागाच्या सामान्य प्रशासन विभागाने आरोग्य सेवेतील ५० टक्के रिक्त पदांवरील पद भरती प्रक्रियेस मान्यता दिली असल्याने www.mahapariksha.gov.in व www.arogya.| maharashtra.gov.in या संकेतस्थळांवर नियुक्ती प्राधिकारीनिहाय रिक्त पदांचा तपशील प्रसिद्धसदर प्रक्रियेमध्ये आवश्यकतेनुसार बदल करण्याचे अधिकार शासन स्तरावर राखून ठेवण्यात पदभरतीबाबत आरोग्य सेवा आयुक्तालयाच्या अधिपत्याखालील रिक्त पदांच्या पद भरतीसाठी फेब्रुवारी २०१९ मध्ये महापोर्टलवर जाहिरात देऊन आवेदने मागविण्यात आली होती; परंतु तत्कालीन परिस्थितीत सदर परीक्षा प्रक्रिया पूर्ण होऊ शकली नाही.
दरम्यान, कोविड-१९ साथरोगाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य सेवेवरील वाढता ताण आणि रिक्त पदे लक्षात घेता, मंत्रिमंडळाने घेतलेल्या निर्णयानुसार सामान्य प्रशासन विभागाने सार्वजनिक आरोग्य विभागास रिक्त पदांपैकी ५० टक्के पदभरतीस मान्यता दिलेली आहे. पद भरती तपशील विभागाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. सदर परीक्षा तातडीने घेणे आवश्यक असल्याने फेब्रुवारी २०१९ मध्ये महापोर्टलवर जाहिरात प्रक्रियेद्वारे जे अर्ज मागविण्यात आले होते त्या अर्जानुसार पात्र असलेले उमेदवार या पद भरतीची परीक्षा देण्यास पात्र ठरतील.
सदर परीक्षा संपूर्ण राज्यात दिनांक २८ फेब्रुवारी २०२१ ला एकाच दिवशी घेण्यात येईल. याबाबतचा तपशील वेळोवेळी वेबसाइटवर जाहीर करण्यात येईल.
मा. सर्वोच्च न्यायालयाने विशेष अनुमती याचिका क्र. १५७३७/१९ आणि इतर याचिकांवरील दिनांक ०९.०९.२०२० च्या सुनावणीत सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्गाच्या (एसईबीसी) आरक्षणास अंतरिम स्थगिती दिलेली आहे.
याबाबत सामान्य प्रशासन विभागाने शासन निर्णय क्र. राआधो-४०१९/न.क्र. ३१/१६-अ दिनांक २३.१२.२०२० नुसार सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्गातील घटकांना अनुज्ञेयतेनुसार आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना (ईडब्ल्यूएस) प्रवर्गाचा लाभ देण्यास मान्यता दिलेली आहे. या अनुषंगाने असे नमूद करण्यात येते की,
बीड : बीड जिल्ह्यात एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. परळी तालुक्यातील…
मुंबई : देशातील हवामानात पुन्हा एकदा मोठे चढउतार पाहायला मिळत आहेत. हवामान विभागाने दिलेल्या ताज्या…
नाशिक : नाशिक जिल्ह्यातील निफाड परिसरात बेपत्ता झालेल्या एका परिचारिकेचा मृतदेह २४ दिवसांनी विहिरीत सापडल्याने…
नागपूर : ज्येष्ठ नेते व माजी मंत्री दत्ताभाऊ मेघे यांच्या निधनाचे वृत्त समजताच विदर्भात शोककळा…
पुणे : वाकड परिसरात २८ वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनिअर महिलेची लग्नाच्या आमिषाने तब्बल ४२.६४ लाख रुपयांची…
मुंबई : २४ वर्षीय सागर गुप्ता या तरुणाचा मृत्यू झाला असून, त्याच्या हत्येप्रकरणी त्याच्या बहिणीचा…