महाराष्ट्र

फळबाग लागवड योजनेसाठी 104 कोटी 50 लाखांच्या निधीस प्रशासकीय मान्यता

मुंबई : राज्यात स्व. भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेच्या सन २०२२ – २०२३ मध्ये अंमलबजावणीसाठी अर्थसंकल्पित केलेल्या एकूण रु. १०४ कोटी ५० लाख रुपये निधीच्या कार्यक्रमास प्रशासकीय मान्यता देण्यात आल्याबाबतचा शासन निर्णय जारी करण्यात आल्याचे रोजगार हमी योजना व फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे यांनी सांगितले.

मंत्री भुमरे म्हणाले, ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत जे शेतकरी फळबाग लागवडीकरिता पात्र ठरु शकत नाहीत अशा शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाने ‘स्व. भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना’ सुरु केली आहे. सन २०२२ -२०२३ च्या प्रथम नऊमाहीकरीता (डिसेंबर २०२२ अखेर आवश्यक असणारा अनिवार्य व कार्यक्रमांतर्गत खर्चाचा अर्थसंकल्प‍ित निधी एकूण वार्षिक तरतूदीच्या ६० टक्केच्या मर्यादेत वितरित केला जाईल’.

सर्वसाधारण प्रवर्गासाठी १०० कोटी, अनुसूचित जाती प्रवर्गासाठी ४ कोटी आणि अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी ५० लाख असे एकूण १०४ कोटी ५० लाख निधीच्या कार्यक्रमास प्रशासकीय मान्यता देण्यात आली असल्याचे भुमरे यांनी यावेळी सांगितले.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

2 आठवडे ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

2 आठवडे ago

पुण्यात विषारी दारू प्यायल्याने १२ जणांचा मृत्यू, दोषींवर कठोर कारवाईचे आदेश

मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…

2 आठवडे ago

व्यसनमुक्ती क्षेत्रातील अविरत समाजकार्याची दखल; डॉ. सोमनाथ गिते यांचा मा. माधुरीताई मिसाळ यांच्या हस्ते सत्कार

पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…

3 आठवडे ago

भरतीच्या बोगस जाहिरातींपासून सावध राहण्याचे आवाहन

मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…

4 आठवडे ago

पुण्यात उष्णतेचा कहर! IMD चा यलो अलर्ट जारी; नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन

पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…

1 महिना ago