Rekha Jare's murder case
अहमदनगर : रेखा जरे यांच्या खुनाला तीन महिने उलटून गेले आहेत. परंतु या खून प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळ बोठे अद्यापही पोलिसांच्या हाती लागलेला नाही. त्यामुळे पोलिसांनी त्याला फरार घोषित करण्याच्या मागणीसाठी चार दिवसांपूर्वी पारनेरच्या न्यायालयात अर्ज दाखल केला होता. त्यावर सुनावणी झाली असून बाळ बोठेच्या अडचणीत वाढ झाली आहे.
बाळ बोठेला फरार घोषित करण्याच्या मागणीचा अर्ज पारनेर न्यायालयाने मंजूर केला आहे. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी उमा बोऱ्हाडे यांनी गुरूवारी हा अर्ज मंजूर केला. बाळ बोठेला पोलिसांसमोर हजर होण्यासाठी एक महिन्याची मुदत देण्यात आली असून त्यानंतर संपत्ती जप्तीची कारवाई केली जाऊ शकते. बोठे याचा अटकपूर्व जामीन अर्ज उच्च न्यायालयाने यापूर्वीच फेटाळला आहे.
या आदेशातील तरतुदींनुसार, आरोपीला हजर होण्यासाठी एक महिन्याची मुदत दिलेली असते. या काळात पोलिस आरोपीचे फोटो सार्वजनिक ठिकाणी प्रसिद्ध करून आरोपीला हजर होण्याचे किंवा लोकांना त्याला पकडून देण्याचे आवाहन करू शकतात. तरीदेखील आरोपी हजर न झाल्यास कायद्यातील तरतुदीनुसार त्याची संपत्ती जप्त करण्याची कारवाई सुरू केली जाते. तसेच बँक खाती सील केली जाऊ शकतात. त्यासाठी पुन्हा न्यायालयात अर्ज करून परवानगी घेतली जाते.
पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…
बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…
नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…
पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…