महाराष्ट्र

वारकरी संप्रदायासाठी दीर्घकालीन आराखडा तयार करण्यात येणार

मुंबई : ज्ञानोबा, तुकाराम आणि इतर संत परंपरा, फुले- शाहू- आंबेडकर यांची विचारसरणी यामुळे जसे महाराष्ट्राला ओळखले जाते, तसेच वारकरी संप्रदायाचा महाराष्ट्र म्हणूनही एक वेगळी ओळख आहे. या वारकरी संप्रदायासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्यासाठी दीर्घकालीन आराखडा राज्य शासनामार्फत तयार करण्यात येईल, असे सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनी सांगितले.

सांस्कृतिक कार्य आणि वारकरी साहित्य परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने संतपीठ संदर्भात बैठक विधानभवनाच्या मध्यवर्ती सभागृहात आज सकाळी आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख, माजी विधानसभा अध्यक्ष आमदार नाना पटोले, वारकरी साहित्य परिषदेचे सचिव डॉ. सदानंद मोरे, खजिनदार ह.भ.प. निवृत्ती महाराज नामदास, कार्याध्यक्ष ह.भ.प. माधव महाराज शिवणीकर, अध्यक्ष ह.भ.प. विठ्ठल पाटील (काकाजी), उपाध्यक्ष ह.भ.प.ज्ञानेश्वर महाराज जळगावकर, उपाध्यक्ष ह.भ.प.बापू महाराज देहूकर, सहसचिव ह.भ.प.नरहरी बुवा चौधरी यांच्यासह पंढरपूर आणि आळंदीचे महाराज आणि वारकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

वृद्ध कलावंतांना देण्यात येणाऱ्या मानधनातही वाढ करण्यात येणार

देशमुख म्हणाले की, आज विधानभवनाच्या मध्यवर्ती सभागृह आयोजित करण्यात आलेल्या संतपीठ बैठकीच्या अनुषंगाने राज्यातील विविध भागातील वारकरी उपस्थित होते. आजच्या या संतपीठ बैठकीच्या अनुषंगाने वारकरी सपंद्रायाचे प्रश्न शासनापर्यंत पोहोचले आहेत. सांस्कृतिक कार्य विभागामार्फत राज्यातील लोककलावंतांना कोविड काळात 5 हजार रुपयांची मदत करण्यात येत आहे. जिल्ह्यातील कलाकारांची नोंदणी करण्याचे काम जिल्हाधिकाऱ्यांमार्फत होत असून राज्यातील कलाकार आणि वारकरी संप्रदाय वर्गाची नोंद घेण्यात येईल. राज्यातील वृद्ध कलावंतांना देण्यात येणाऱ्या मानधनातही वाढ करण्यात येईल.

आज या निमित्ताने वारकरी संप्रदायाने शासनाकडे केलेल्या मागण्या मान्य असून या संप्रदायाकडे लक्ष देणे, त्यांची काळजी घेणे ही शासनाची जबाबदारी आहे. आजच्या या बैठकीच्या अनुषंगाने वारकरी संप्रदायाने केलेल्या मागण्यांची पूर्तता करण्यासाठी राज्य शासन सकारात्मक असल्याचेही देशमुख यांनी यावेळी सांगितले.

थोरात म्हणाले की, विधानभवनाच्या मध्यवर्ती सभागृहात आयेाजित करण्यात आलेल्या संतपीठ बैठकीच्या अनुषंगाने राज्यातील वेगवेगळ्या भागातून मोठा वारकरी संप्रदाय आज येथे उपस्थित झाला आणि या वारकरी संप्रदायाला भेटता आले याचा आनंद आहे. महाराष्ट्रात संतपीठ होण्यासाठी आपण सर्वांनी पुढाकार घेणे आवश्यक आहे कारण या संतपीठाच्या माध्यमातून संतांनी दिलेली शिकवण, आचार विचार, आपली संस्कृती परंपरा आजच्या पिढीपर्यंत पोहोचण्यास मदत होणार आहे.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

स्वातंत्र्यदिनानिमित्त डॉ. सोमनाथ गिते यांचा महापौरांच्या हस्ते गौरव

पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…

2 आठवडे ago

लग्न ठरलेल्या प्रियकरासोबत तरुणीचा संशयास्पद मृत्यू; आईचा गंभीर आरोप

बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…

3 आठवडे ago

चार महिन्यांपूर्वीचा नवाकोरा रस्ता ऑप्टिकल फायबरसाठी फोडला; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांचा संताप; काम बंद पाडून अधिकाऱ्यांना जाब

नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…

3 आठवडे ago

‘उघडलेले पुस्तक’ पॅनेलचा दणदणीत विजय; सर्व १५ उमेदवार विजयी; सर्व प्रवर्गांत परिवर्तन आणि सुशासन पॅनेलला यश

पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…

3 आठवडे ago

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

3 महिने ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

3 महिने ago