A huge fire broke out in a cylinder warehouse in Versova area
मुंबई : वर्सोवा परिसरातील यारी रोडजवळ भीषण आग लागली आहे. सिलिंडरचा स्फोट झाल्यामुळे येथील सिलेंडरच्या गोदामालाच आग लागली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, लागलेली आग ही लेव्हल 2 ची असून यामध्ये आतापर्यंत 4 जण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. अग्निशमन दलाच्या 15 गाड्या घटनास्थळी पोहोचल्या असून आग विझवण्याचे काम युद्धपातळीवर सुरु आहे.
सिलेंडरच्या गोदामालाच आग लागल्यानं परिसरात भितीचे वातावरण पसरले आहे. गोदामातून मोठ्या प्रमाणात सिलेंडरच्या स्फोटाच्या आवाजानं परिसर हादरला आहे. सध्या अग्निशमन दलाचे १५ बंब घटनास्थळी दाखल झाले असून आग आटोक्यात आणण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. या आगीत संपूर्ण गोदाम जळून खाक झाले आहे.
सर्व जखमींना ताबडतोब कूपर रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, राकेश कडू (30) आणि लक्ष्मण कुमावत (24) मनजित खान (२०) आणि मुकेश कुमावत (30) अशी जखमींची नावे आहेत.
पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…
बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…
नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…
पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…