महाराष्ट्र

जी 20 परिषदेनिमित्त राज्याला जगासमोर प्रदर्शित करण्याची सुवर्णसंधी

नवी दिल्ली : जी २० परिषदेच्या निमित्ताने राज्याला जगासमोर प्रदर्शित करण्याची संधी मिळणार असल्याची प्रतिक्रिया बैठकीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी बोलताना दिली. येथील राष्ट्रपती भवनातील सांस्कृतिक सभागृहात आज जी 20 परिषदेसंदर्भात सूचना, चर्चा आणि धोरण ठरविण्याबाबत सर्वपक्षीय बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीस मुख्यमंत्री शिंदे उपस्थित होते.

या बैठकीच्या अध्यक्षस्थानी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी होते. यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर, वित्तमंत्री निर्मला सीतारामन, पर्यावरणमंत्री भूपेंद्र यादव उपस्थित होते. यासह विविध पक्ष प्रमुख या बैठकीस उपस्थित होते.

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, महाराष्ट्रातील मुंबई, पुणे, नागपूर, संभाजीनगर (औरंगाबाद) या चार ठिकाणी जी 20 च्या 14 बैठका होणार आहेत. यानिमित्त राज्याचे ब्रॅण्डींग, राज्यातील विकासाचे प्रकल्प, आपली संस्कृती, जगासमोर मांडण्याची संधी लाभली आहे. या दृष्टीने राज्यात गतीने कामे सुरू असल्याचेही ते यावेळी म्हणाले.,राज्यात आतापर्यंत जी-20 च्या संदर्भात झालेल्या तयारीचा आढावा घेण्यात आला असून, मुख्यमंत्री शिंदे यांनी राज्यात यासंदर्भात सुरू असलेल्या कामांबाबत माहिती दिली. जी 20 बैठकीचे स्वरूप कसे असेल याबाबत याप्रसंगी सादरीकरण झाले.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

स्वातंत्र्यदिनानिमित्त डॉ. सोमनाथ गिते यांचा महापौरांच्या हस्ते गौरव

पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…

4 आठवडे ago

लग्न ठरलेल्या प्रियकरासोबत तरुणीचा संशयास्पद मृत्यू; आईचा गंभीर आरोप

बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…

4 आठवडे ago

चार महिन्यांपूर्वीचा नवाकोरा रस्ता ऑप्टिकल फायबरसाठी फोडला; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांचा संताप; काम बंद पाडून अधिकाऱ्यांना जाब

नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…

1 महिना ago

‘उघडलेले पुस्तक’ पॅनेलचा दणदणीत विजय; सर्व १५ उमेदवार विजयी; सर्व प्रवर्गांत परिवर्तन आणि सुशासन पॅनेलला यश

पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…

1 महिना ago

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

3 महिने ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

3 महिने ago