महाराष्ट्र

संतापजनक : पुण्यात पाच वर्षाच्या चिमुकलीवर सुरक्षारक्षकाने केला बलात्कार, रुग्णालयात उपचार सुरू

पुणे : विमाननगर भागात अतिशय संतापजनक घटना घडली आहे. एका हॉटेलच्या सुरक्षारक्षकाने पाच वर्षाच्या चिमुकलीवर बलात्कार केला. या प्रकरणी पोलिसांनी दिलीपकुमार गोस्वामी नावाच्या २0 वर्षीय आरोपीला अटक केली आहे. पीडित चिमुकलीवर सध्या उपचार सुरू आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी आणि तिचे आई वडील एका लेबर कॅम्पमध्ये राहतात. आई वडील कामावर गेल्यानंतर आरोपीने या मुलीला घराबाहेर बोलवून घेतलं. त्यानंतर आरोपी ज्या हॉटेलमध्ये सुरक्षा रक्षक म्हणून काम करतो, त्याच्या बाजूला असलेल्या पार्किंगमध्ये तिला घेऊन गेला. तिथे नेऊन त्याने तिच्यावर अत्याचार केला. या धक्कादायक घटनेनंतर पीडित चिमुकली अतिशय घाबरलेल्या अवस्थेत घरी गेली.

मुलीची आई कामावरून घरी आली होती. मुलीची अवस्था पाहिल्यानंतर आईने चौकशी केली. तेव्हा तिने आईला घडलेली हकिकत सांगितली. त्यानंतर मुलीची आई तात्काळ पोलीस स्टेशनमध्ये गेली आणि पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला. पोलिसांनी कारवाई करत आरोपीला ताब्यात घेतलं. पीडित चिमुकलीवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

1 महिना ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

1 महिना ago

पुण्यात विषारी दारू प्यायल्याने १२ जणांचा मृत्यू, दोषींवर कठोर कारवाईचे आदेश

मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…

1 महिना ago

व्यसनमुक्ती क्षेत्रातील अविरत समाजकार्याची दखल; डॉ. सोमनाथ गिते यांचा मा. माधुरीताई मिसाळ यांच्या हस्ते सत्कार

पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…

1 महिना ago

भरतीच्या बोगस जाहिरातींपासून सावध राहण्याचे आवाहन

मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…

2 महिने ago

पुण्यात उष्णतेचा कहर! IMD चा यलो अलर्ट जारी; नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन

पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…

2 महिने ago