5 killed in serum fire, Health Minister Rajesh Tope said
पुणे : सीरम इन्स्टिट्यूटच्या नवीन बिल्डिंगला दुपारी दोनच्या सुमारास आग लागली. जवळपास साडेतीन तासानंतर या आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं आहे. मात्र या अग्नितांडवात पाच जणांचा मृत्यू झाला आहे. आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी मुंबईत पत्रकार परिषदेदरम्यान ही माहिती दिली.
दुसरीकडे पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. मांजरी एसईझेड प्लँटमध्ये आग लागली. संपूर्ण आग विझल्यानंतर, आत जाऊन पाहिल्यानंतर 5 मृतदेह सापडले आहेत. आगीत पहिला मजला जळून खाक झाला. या आगीत पाच जणांचा मृत्यू झाला. त्यांचे मृतदेह ताब्यात घेऊन ते शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले. आगीचं कारण अस्पष्ट आहे. प्राथमिक अंदाजानुसार या इमारतीचं बांधकाम सुरु होतं. तिथे वेल्डिंगचं काम सुरु होतं अशी शक्यता आहे, अशी माहिती मुरलीधर मोहोळ यांनी दिली.
जिथे कोरोनाची लस बनवण्याचं काम होत आहे, ती जागा सुरक्षित आहे. या जागेच्या विरुद्ध बाजूला जे गेट आहे, तिथे ही आग लागल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळे कोव्हिशिल्ड लसीला कोणताही धोका नाही. कोव्हिशिल्ड लस गेट नंबर ३,४ आणि ५ या परिसरात बनवली जाते आणि तो भाग सुरक्षित आहे.
बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…
नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…
पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…
मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…