महाराष्ट्र

पत्नीच्या सततच्या छळाला कंटाळून तरुणाची आत्महत्या, मोबाईलमध्ये मृत्यूपूर्वीचा व्हिडिओ, पत्नीला अटक

पुणे : राज्यभरात आत्महत्येच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असतानाच, पुणे जिल्ह्यातील उरुळी कांचन परिसरातील कोरेगाव मूळ येथे एका ३२ वर्षीय तरुणाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पत्नीच्या सततच्या छळाला कंटाळून त्याने आयुष्य संपवल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला असून, आत्महत्येपूर्वी त्याने मोबाईलमध्ये स्वतःचे दु:ख सांगणारा व्हिडिओही शूट केला आहे. आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव सुरज दामोदर पवार (वय ३२, रा. कोरेगाव मूळ, ता. हवेली) असे आहे. ही घटना बुधवारी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरज आणि मयुरी यांचा दोन वर्षांपूर्वी विवाह झाला होता. ते कोरेगाव मूळ येथील इनामदार वस्ती परिसरात राहत होते. गेल्या काही काळात दोघांमध्ये सतत वाद होत असल्याची माहिती कुटुंबीयांनी दिली. बुधवारी किरकोळ कारणावरून त्यांच्यात पुन्हा एकदा वाद झाला, आणि त्यानंतर सुरजने राहत्या घरात छताच्या अँगलला साडीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली.

मोबाईलमध्ये मृत्यूपूर्वीचा व्हिडिओ
सुरजने आत्महत्या करण्याआधी मोबाईल फोनमध्ये एक व्हिडिओ शूट केला होता. या व्हिडिओमध्ये त्याने पत्नी मयुरीने दिलेला मानसिक त्रास, वारंवार होणारी भांडणे, आणि शारीरिक व भावनिक छळ यांचा उल्लेख केला आहे. या त्रासाला कंटाळूनच त्याने टोकाचे पाऊल उचलल्याचे त्याच्या निवेदनातून स्पष्ट होत असल्याचे पोलिसांनी सांगितले.

पत्नीविरोधात गुन्हा दाखल, अटक
या प्रकरणी सुरज पवार यांचे वडील दामोदर निवृत्ती पवार (वय ६०, व्यवसाय – शेती, रा. वाल्हे, वागदरवाडी, ता. पुरंदर) यांनी हडपसर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यांच्या तक्रारीवरून सुरज यांची पत्नी मयुरी सुरज पवार ऊर्फ मयुरी अनिल जाधव (वय २६) हिच्यावर भारतीय दंड संहितेच्या बीएनएस कलम १०८, ११८(१), ११५(२) अन्वये गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे.

दरम्यान, या घटनेनंतर पवार कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. परिसरात आणि नातलगांमध्ये मोठ्या प्रमाणात हळहळ व्यक्त होत असून, अशा दुर्दैवी घटनांपासून तरुण पिढीला वाचवण्यासाठी पुढे येण्याची गरज असल्याचे बोलले जात आहे.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Share
Published by
थोडक्यात घडामोडी टीम

Recent Posts

स्वातंत्र्यदिनानिमित्त डॉ. सोमनाथ गिते यांचा महापौरांच्या हस्ते गौरव

पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…

2 आठवडे ago

लग्न ठरलेल्या प्रियकरासोबत तरुणीचा संशयास्पद मृत्यू; आईचा गंभीर आरोप

बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…

2 आठवडे ago

चार महिन्यांपूर्वीचा नवाकोरा रस्ता ऑप्टिकल फायबरसाठी फोडला; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांचा संताप; काम बंद पाडून अधिकाऱ्यांना जाब

नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…

2 आठवडे ago

‘उघडलेले पुस्तक’ पॅनेलचा दणदणीत विजय; सर्व १५ उमेदवार विजयी; सर्व प्रवर्गांत परिवर्तन आणि सुशासन पॅनेलला यश

पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…

3 आठवडे ago

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

3 महिने ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

3 महिने ago