महाराष्ट्र

राज्यात लम्पीचे 31,179 पशुधन उपचाराने बरे, सुमारे 80.86 टक्के गोवंशीय पशुधनाचे लसीकरण पूर्ण

मुंबई : राज्यात पशुधनास मोफत लम्पी चर्मरोगाचे लसीकरण करण्यात आले आहे. अकोला, जळगांव, कोल्हापूर, सांगली, वाशिम, मुंबई उपनगर आणि सातारा या जिल्ह्यांमधील लसीकरण 100 टक्के झाले आहे. खासगी संस्था, सहकारी दूध संघ आणि वैयक्तिक पशुपालकांनी करून घेतलेले लसीकरण यांची आकडेवारी नुसार राज्यात सुमारे ८०.86 टक्के गोवंशीय पशुधनाचे लसीकरण झाले असून बाधित पशुधनापैकी एकूण 31 हजार 179 पशुधन उपचाराने बरे झाले असल्याचे पशुसंवर्धन आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांनी सांगितले.

सिंह म्हणाले, राज्यामध्ये 6 ऑक्टोबर 2022 अखेर 32 जिल्ह्यांमधील एकूण 2238 गावांमध्ये लम्पी चर्मरोग प्रादुर्भाव दिसून आला आहे. बाधित गावांतील एकूण 59 हजार 865 बाधित पशुधनापैकी एकूण 31 हजार 179 पशुधन उपचाराने बरे झालेले आहे. उर्वरित बाधित पशुधनावर उपचार सुरु आहेत. राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये आज अखेर एकूण 115.11 लक्ष लस उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामधून एकूण 113.14 लक्ष पशुधनास मोफत लसीकरण करण्यात आले आहे.

राज्यात 6 ऑक्टोबर 2022 पर्यंत जळगाव जिल्ह्यातील 421, अहमदनगर जिल्ह्यातील 252, धुळे जिल्ह्यात 35, अकोला जिल्ह्यात 393, पुणे जिल्ह्यात 136, लातूर मध्ये 25, औरंगाबाद 77, बीड 8, सातारा जिल्ह्यात 182, बुलडाणा जिल्ह्यात 367, अमरावती जिल्ह्यात 296, उस्मानाबाद 9, कोल्हापूर 117, सांगली मध्ये 24, यवतमाळ 3, परभणी – 2, सोलापूर 28, वाशिम जिल्हयात 37, नाशिक 8, जालना जिल्ह्यात 15, पालघर 2, ठाणे 28, नांदेड 25, नागपूर जिल्ह्यात 6, हिंगोली 1, रायगड 7, नंदुरबार 21, वर्धा 2 व गोंदिया – 1 असे एकूण 2 हजार 528 पशुधनाचा मृत्यू झाला असल्याचे सिंह यांनी सांगितले.

सिंह म्हणाले, पशुपालकांनी भीती बाळगण्याचे कारण नसले तरी त्यांनी आवश्यक खबरदारी घ्यावी. संबधित रोगाचा उपचार लक्षणे दिसल्यानंतर वेळेतच सुरू झाल्यास, मृत्यूची शक्यता अत्यंत कमी असून बहुतांश पशु उपचाराला चांगला प्रतिसाद देत आहेत. तरी सर्व पशुपालकांनी लम्पी चर्म रोगाच्या संभाव्य लक्षणांकडे बारकाईने लक्ष ठेवावे व त्वरित नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्याशी संपर्क साधावा.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

1 महिना ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

1 महिना ago

पुण्यात विषारी दारू प्यायल्याने १२ जणांचा मृत्यू, दोषींवर कठोर कारवाईचे आदेश

मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…

1 महिना ago

व्यसनमुक्ती क्षेत्रातील अविरत समाजकार्याची दखल; डॉ. सोमनाथ गिते यांचा मा. माधुरीताई मिसाळ यांच्या हस्ते सत्कार

पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…

2 महिने ago

भरतीच्या बोगस जाहिरातींपासून सावध राहण्याचे आवाहन

मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…

2 महिने ago

पुण्यात उष्णतेचा कहर! IMD चा यलो अलर्ट जारी; नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन

पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…

2 महिने ago