महाराष्ट्र

पोहरादेवी येथील महंतांसह 19 जणांना कोरोनाची लागण, ‘त्या’ हजारो जणांचं काय होणार?

वाशिम : पोहरादेवी येथे दोन दिवसांपूर्वी वनमंत्री संजय राठोड यांच्या समर्थनार्थ विविध ठिकाणहून हजारोंच्या संख्येने लोक जमले होते. येथे कोरोना नियमांचे उल्लंघन झाले होते. या गर्दीतून कोरोना संक्रमणाची मोठी भीती व्यक्त केली जात होती. त्यामुळे येथे जमलेल्या गर्दीला पांगवण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीचार्जही करावा लागला होता. आता पोहरादेवी येथील महंत कबिरदास महाराज यांच्यासह एकूण 19 जणांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती मिळाली आहे.

कबिरदास महाराज पोहरादेवी मंदिर आणि सेवालाल महाराज ट्रस्टचे अध्यक्ष आहे. कबिरदास महाराज यांच्या कुटुंबातील तिघांनाही कोरोनाची लागण झाली आहे. काही जणांना कोरोनाची लक्षणं असल्याचीही माहिती समोर येत आहे. 23 फेब्रुवारी रोजी संजय राठोड यांनी प्रथम महंत कबिरदास महाराज यांची भेट घेतली होती. दरम्यान, कोरोनाचे नियम न पाळता गर्दी होत असेल तर संबंधितावर कारवाई करावी, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले होते. त्यामुळे आता काय कारवाई केली जाणार, हा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

स्वातंत्र्यदिनानिमित्त डॉ. सोमनाथ गिते यांचा महापौरांच्या हस्ते गौरव

पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…

7 दिवस ago

लग्न ठरलेल्या प्रियकरासोबत तरुणीचा संशयास्पद मृत्यू; आईचा गंभीर आरोप

बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…

2 आठवडे ago

चार महिन्यांपूर्वीचा नवाकोरा रस्ता ऑप्टिकल फायबरसाठी फोडला; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांचा संताप; काम बंद पाडून अधिकाऱ्यांना जाब

नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…

2 आठवडे ago

‘उघडलेले पुस्तक’ पॅनेलचा दणदणीत विजय; सर्व १५ उमेदवार विजयी; सर्व प्रवर्गांत परिवर्तन आणि सुशासन पॅनेलला यश

पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…

2 आठवडे ago

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

3 महिने ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

3 महिने ago