महाराष्ट्र

एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत १८ हजार ८८२ पदे भरणार

मुंबई : महिला व बालविकास विभाग अंतर्गत एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत अंगणवाडी सेविका 5639 व मदतनीस 13243 अशी एकूण १८ हजार ८८२ पदे भरण्यात येणार आहेत. संपूर्ण भरती प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने होणार असून उमेदवारांनी कोणत्याही आमिषाला बळी न पडण्याचे आवाहन महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी केले. राज्य शासन 75 हजार पदभरती करणार आहे यापैकी 18 हजार पेक्षा जास्त पदभरती महिला व बाल विकास विभाग करीत असल्याचेही तटकरे यांनी सांगितले.

१४ फेब्रुवारी ते २ मार्च या कालावधीत मुख्यसेविका या पदाची सरळसेवा व निवडीद्वारे ३७४ पदभरतीची परिक्षा होणार आहे.

मंत्रालयात महिला सहकारी संस्था, महिला बचत गट, महिला मंडळ व अंगणवाडीबाबतच्या विविध प्रश्नांबाबत तसेच, भिवंडी शहरातील अंगणवाडी केंद्रांची संख्या वाढविण्याबाबत, कर्मचारी व अधिकारी यांच्या पदभरती संदर्भात मंत्रालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी सर्व कामांचा आणि पदभरतीसंदर्भात आढावा घेतला.

महिला व बाल विकास मंत्री तटकरे म्हणाल्या की, मुख्यसेविका यांची सरळसेवेने १०२ म्हणजे ८० टक्के पदे, तर निवडीद्वारे २७२ म्हणजेच १०० टक्के पदे भरावयाची आहेत. १४ फेब्रुवारी ते २ मार्च या कालावधीत होणाऱ्या या परिक्षा पारदर्शक वातावरणात होण्यासाठी आवश्यक ती सर्व कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

राज्यातील एकूण ५५३ बाल विकास प्रकल्प कार्यालय अंतर्गत एक लाख १० हजार ५९१ अंगणवाडी केंद्रे कार्यरत असून, ५६३९ अंगणवाडी सेविका व १३२४३ अंगणवाडी मदतनीस यांची रिक्त पदे भरण्याबाबतही कार्यवाही करण्याचे निर्देश तटकरे यांनी दिले.

याचबरोबर राज्य महिला आयोग, महिला आर्थिक विकास महामंडळ, बाल कल्याण समिती, बाल न्याय मंडळातील रिक्त पदांचीही भरती करण्याचे निर्देश तटकरे यांनी दिले.

महिला बचतगटांचे आदर्श कम्युनिटी किचन

महिला बचत गटांनी एकत्रितरित्या पोषण आहाराकरिता आदर्श कम्युनिटी किचन करावे, यासाठी सर्वतोपरी निधी उपलब्ध करून दिला जाईल. अंगणवाडी आहार पुरवठ्याच्या कामासाठी एका संस्थेला पाच अंगणवाड्या दिल्या जातात. लाभार्थी महिला विकास संस्थेच्या कामाच्या अहवालानंतर अंगणवाड्यांची संख्या वाढविणे अथवा कमी करण्याबाबत निर्णय घेण्यात येईल.

भिवंडी निजामपूर महानगरपालिका हद्दीतील लोकसंख्या वाढीनुसार अंगणवाडी संख्या वाढविण्याबाबत सर्वेक्षण करून अहवाल सादर करावा. एकूण ३४१ केंद्रे असून लोकसंख्येनुसार १०२ अतिरिक्त अंगणवाड्यांच्या मागण्यांबाबत सकारात्मक विचार असल्याचे तटकरे यांनी यावेळी सांगितले.

प्रत्येक नगरपालिकेत महिला बाल विकास विभागाचा अधिकारी असावा, तसेच अंगणवाड्या शाळेतील रिकाम्या वर्गखोल्यात सुरू करण्यासाठी शालेय शिक्षण विभागाशी समन्वय साधावा, पिण्याचे पाणी, स्वच्छतागृह उपलब्ध करून द्यावेत. प्रत्येक गरजू महिला व बालकांना पोषण आहार उपलब्ध करून देण्याचे निर्देश यावेळी मंत्री तटकरे यांनी दिले. यावेळी आमदार प्रवीण दरेकर, रईस शेख, सचिव अनुपकुमार यादव, आयुक्त कैलास पगारे, बचत गटाच्या विभागीय अध्यक्ष जयश्री पांचाळ यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

स्वातंत्र्यदिनानिमित्त डॉ. सोमनाथ गिते यांचा महापौरांच्या हस्ते गौरव

पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…

1 आठवडा ago

लग्न ठरलेल्या प्रियकरासोबत तरुणीचा संशयास्पद मृत्यू; आईचा गंभीर आरोप

बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…

2 आठवडे ago

चार महिन्यांपूर्वीचा नवाकोरा रस्ता ऑप्टिकल फायबरसाठी फोडला; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांचा संताप; काम बंद पाडून अधिकाऱ्यांना जाब

नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…

2 आठवडे ago

‘उघडलेले पुस्तक’ पॅनेलचा दणदणीत विजय; सर्व १५ उमेदवार विजयी; सर्व प्रवर्गांत परिवर्तन आणि सुशासन पॅनेलला यश

पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…

2 आठवडे ago

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

3 महिने ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

3 महिने ago