Legislature
मुंबई : राज्यातील डोंगरी तालुके, कोकण आणि आदिवासी भागातील सर्व रस्ते बारमाही वाहतुकीसाठी जोडण्यासाठी नवीन साकव व्हावेत अशी अनेक ठिकाणांवरून मागणी आहे. यासाठी सुमारे १३०० कोटींचा आराखडा तयार करण्यात येत आहे, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी विधानसभेत दिली.
सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर तालुक्यातील शिंदी ते आरव येथील लोखंडी पूल दुरुस्ती दरम्यान झालेल्या अपघाताबाबत विधानसभा सदस्य रईस शेख यांनी विधानसभेत प्रश्न उपस्थित केला होता.
मंत्री चव्हाण म्हणाले की, महाबळेश्वर तालुक्यातील शिंदी ते आरव दरम्यानच्या तुटलेल्या पुलाच्या कामाची निविदा मंजूर करण्यात आली असून ते काम पुढील पावसाळ्यापूर्वी पूर्ण केलं जाईल. या आराखड्यातून ओढे, नाले यावरील छोटे पूल पक्क्या स्वरूपात बांधले जातील आणि अशा साकवांसाठी एक कोटीपर्यंतचा निधी उपलब्ध करून दिला जाईल. यावेळी सदस्य सर्वश्री रवी पाटील, योगेश कदम, संग्राम थोपटे, प्रकाश आबिटकर यांनी सहभाग घेतला.
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…
मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…
पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…
मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…
पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…