women must do these things after sexual relation for better health
बहुतेक स्त्रियांना उंच पुरुष आवडतात पण कमी उंचीच्या पुरुषांचीही स्वतःची अशी खासियत असते. ‘द जर्नल ऑफ सेक्शुअल मेडिसिन’ मधील एका नवीन अभ्यासात कमी उंचीच्या पुरुषांशी संबंधित अनेक मनोरंजक माहिती समोर आली आहे. अभ्यासात असे आढळून आले आहे की कमी उंची असलेले पुरुष लैंगिकदृष्ट्या अधिक सक्रिय असतात. न्यूयॉर्क युनिव्हर्सिटीमधील संशोधकांनी 531 पुरुषांवर केलेल्या अभ्यासातून हे स्पष्ट झाले आहे.
अभ्यासात असे आढळून आले की जे पुरुष 175 सेमी पेक्षा कमी उंचीचे होते, म्हणजेच ज्यांची उंची 5’९” पेक्षा कमी होती, ते लैंगिकदृष्ट्या अधिक सक्रिय तर होतेच, त्याचबरोबर त्यांचे जोडीदाराशी घटस्फोट घेण्याचे प्रमाण 32 टक्के कमी होते. संशोधकांचे म्हणणे आहे की कमी उंची असलेले पुरुष घरातील कामे जास्त करतात आणि उंच पुरुषांपेक्षा जास्त पैसेदेखील कमावतात. एकूणच या अभ्यासानुसार, पुरुषाची उंची जितकी कमी असेल तितका तो चांगला जोडीदार असल्याचे सिद्ध होईल.
स्त्रियांना कमी उंची असलेले पुरुष आवडत नाहीत असे अजिबात नाही. अशी अनेक प्रसिद्ध सेलिब्रिटी जोडपी देखील आहेत, ज्यात स्त्रिया पुरुषांपेक्षा उंच असतात. या अभ्यासाला अनेक सेलिब्रिटींचा पाठिंबा मिळाला आहे. स्पायडरमॅन चित्रपटाचा नायक टॉम हॉलंड यानेही हा अभ्यास शेअर केलेली पोस्ट लाइक केली आहे. तेव्हापासून या अभ्यासाची अधिक चर्चा होत आहे. दरम्यान, संशोधकांना यामागचे कारण पूर्णपणे समजलेले नाही, परंतु त्यांना वाटते की उंच पुरुष त्यांच्या दिसण्याबद्दल अधिक आत्मविश्वास बाळगतात आणि त्यांना घरातील कामे करण्यात कमीपणा वाटतो. दुसरीकडे, कमी उंची असलेले पुरुष स्वतःला सिद्ध करण्यात गुंतलेले असतात आणि यामुळेच ते घरी आणि ऑफिसमध्ये कठोर परिश्रम करतात.
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…
मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…
पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…
मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…
पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…