लाइफ स्टाइल

मोबाईल आणि लॅपटॉपच्या वाढत्या वापराचा डोळ्यांवर होतोय वाईट परिणाम, ‘अशी’ घ्या काळजी

कोरोना काळात मुलांसाठी सुरू झालेल्या ऑनलाइन शिक्षणाचा त्यांच्या डोळ्यांवर सर्वात वाईट परिणाम झाला आहे. बराच वेळ स्क्रीनकडे पाहिल्यामुळे डोळे चुरचुरणे, डोळ्यांची जळजळ, लालसरपणा, थकवा येण्याची समस्या उद्भवत आहे. डिजीटल स्क्रीनकडे दीर्घकाळ पाहत राहिल्याने पापण्यांची उघडझाप कमी होते, ज्यामुळे या प्रकारच्या समस्या उद्भवत आहेत. बहुतेक मुलांमध्ये या काळात कोरड्या डोळ्यांची (Dry Eye) समस्या निर्माण झाली आहे.

कोरोना संसर्गाच्या काळात बहुतेक लोक घरून काम करत आहेत. ज्यामुळे सर्व वयोगटातील लोकांमध्ये डोळ्यांच्या समस्या झपाट्याने वाढल्या आहेत.

या गोष्टींची काळजी घ्या:

  1. मोबाईलपासून सुमारे 18 इंच अंतर ठेवा.
  2. स्क्रीनवर काम करताना डोक्यावर जास्त प्रकाश येणार नाही, याची काळजी घ्या. आपण संरक्षणासाठी अँटी स्क्रीन गार्ड देखील वापरू शकता.
  3. 20 मिनिटे काम केल्यानंतर, 20 सेकंदांचा ब्रेक घ्या आणि डिजिटल स्क्रीनपासून 20 इंच अंतर ठेवा.
  4. अंधारात मोबाईल आणि स्क्रीनपासून दूर राहा. कारण मोबाईलचा प्रकाश डोळ्यातील पडद्याला नुकसान करतो.
  5. स्क्रीनवर काम करत असताना मधून-मधून डोळ्यांच्या पापण्यांची उघडझाप करत राहा. ठराविक वेळेनंतर, आपली नजर स्क्रीनवरून बाजूला घ्या आणि काही अंतरावर पहा.
  6. स्क्रीन स्वच्छ ठेवून काम करा आणि रंगांच्या संयोजनाची विशेष काळजी घ्या.

‘या’ पदार्थांचे सेवन ठरेल फायदेशीर :

  1. पालेभाज्या खाल्ल्याने व्हिटॅमिन सीचा पुरवठा होतो. पालेभाज्यांमध्ये आढळणारे फोलेट दृष्टी कमी होणे थांबवण्यास हातभार लावते.
  2. अक्रोड, काजू, शेंगदाणे खाल्ल्याने ओमेगा -3 आणि व्हिटॅमिन ई मिळते, ज्यामुळे अश्रूंची निर्मिती होते.
  3. चिया आणि फ्लॅक्ससीडसह बदाम खाल्ल्याने ओमेगा -3 मिळते. ज्यामुळे दृष्टी वाढण्यास मदत होते.
  4. बीन्समध्ये फायबर, प्रथिने, फोलेट आणि जस्त आढळतात, जे डोळ्यांचे नुकसान होण्यापासून संरक्षण देतात.
Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

स्वातंत्र्यदिनानिमित्त डॉ. सोमनाथ गिते यांचा महापौरांच्या हस्ते गौरव

पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…

3 आठवडे ago

लग्न ठरलेल्या प्रियकरासोबत तरुणीचा संशयास्पद मृत्यू; आईचा गंभीर आरोप

बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…

4 आठवडे ago

चार महिन्यांपूर्वीचा नवाकोरा रस्ता ऑप्टिकल फायबरसाठी फोडला; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांचा संताप; काम बंद पाडून अधिकाऱ्यांना जाब

नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…

4 आठवडे ago

‘उघडलेले पुस्तक’ पॅनेलचा दणदणीत विजय; सर्व १५ उमेदवार विजयी; सर्व प्रवर्गांत परिवर्तन आणि सुशासन पॅनेलला यश

पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…

1 महिना ago

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

3 महिने ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

3 महिने ago