काम-धंदा

RBI मध्ये विविध पदांवर भरती सुरू, जाणून घ्या..

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये (RBI) नॉन-सीएसजी पदांवर भरती सुरू करण्यात आली आहे. या पदांवरील वेतनश्रेणी दरमहा पगार ७७,२०८ रुपये असेल. बँकेतील नोकरी हवी असणाऱ्या उमेदवारांसाठी ही एक उत्तम संधी आहे. या भरतीसाठी रिझर्व्ह बँकेने अधिसूचना जारी केली आहे.

रिक्त पदे :

  1. लीगल ऑफिसर (ग्रेड-बी) – ११ पदे (वेतनश्रेणी दरमहा ७७,२०८ रुपये)
  2. व्यवस्थापक (टेक्निकल-सिव्हिल) – ०१ पद (वेतनश्रेणी दरमहा ७७,२०८ रुपये)
  3. असिस्टंट मॅनेजर (राजभाषा) – १२ पदे (वेतनश्रेणी दरमहा ६३,१७२ रुपये)
  4. असिस्टंट मॅनेजर (प्रोटोकॉल व सुरक्षा) – ०५ पदे (वेतनश्रेणी दरमहा ६३,१७२ रुपये)

एकूण पदांची संख्या – २९

अर्जाचा तपशील

या रिक्त जागांसाठी ऑनलाइन अर्ज करायचा आहे. आरबीआयच्या rbi.org.in या अधिकृत संकेतस्थळावर भेट द्या. ऑनलाइन अर्जाची लिंक २३ फेब्रुवारी २०२१ पासून अॅक्टिव्ह होत आहे. अर्ज करण्याची अंतिम मुदत १० मार्च २०२१ पर्यंत आहे. सर्वसाधारण, ओबीसी प्रवर्गांसाठी ६०० रुपये तर एससी, एसटी प्रवर्गांसाठी १०० रुपये इतके अर्जांचे शुल्क आहे.

आवश्यक पात्रता :

लीगल ऑफिसर – कायद्याची पदवी आणि दोन वर्षांचा कामकाजाचा अनुभव. वयोमर्यादा २१ ते २३ वर्षे.
मॅनेजर (टेक्निकल) – सिव्हिल इंजिनिअरिंगमधील बॅचलर डिग्री आणि तीन वर्षांचा कामाचा अनुभव. वयोमर्यादा २१ ते ३५ वर्षे.
असिस्टंट मॅनेजर (राजभाषा) – हिंदी किंवा हिंदी अनुवादात पदव्युत्तर पदवी. इंग्रजी विषयात पदवीपर्यंतचे शिक्षण. वयोमर्यादा २१ ते ३० वर्षे.
सहाय्यक व्यवस्थापक (प्रोटोकॉल आणि सुरक्षा) – सैन्य (Army), नौदल (Navy) किंवा हवाई दलात (Air Force) कमीतकमी ५ वर्षे अधिकारी दर्जाची सेवा केलेली असणे आवश्यक आहे.

निवड कशी केली जाईल :

लेखी परीक्षा व मुलाखतीच्या आधारे निवड केली जाईल. लेखी चाचणी १० एप्रिल २०२१ रोजी घेण्यात येईल.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

स्वातंत्र्यदिनानिमित्त डॉ. सोमनाथ गिते यांचा महापौरांच्या हस्ते गौरव

पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…

1 आठवडा ago

लग्न ठरलेल्या प्रियकरासोबत तरुणीचा संशयास्पद मृत्यू; आईचा गंभीर आरोप

बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…

2 आठवडे ago

चार महिन्यांपूर्वीचा नवाकोरा रस्ता ऑप्टिकल फायबरसाठी फोडला; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांचा संताप; काम बंद पाडून अधिकाऱ्यांना जाब

नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…

2 आठवडे ago

‘उघडलेले पुस्तक’ पॅनेलचा दणदणीत विजय; सर्व १५ उमेदवार विजयी; सर्व प्रवर्गांत परिवर्तन आणि सुशासन पॅनेलला यश

पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…

3 आठवडे ago

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

3 महिने ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

3 महिने ago