काम-धंदा

दहावी आणि ITI उत्तीर्णांसाठी नोकरीची संधी, पश्चिम रेल्वेत हजारो पदांवर अप्रेंटिसशिप भरती

Railway Recruitment २०२१ : दहावी उत्तीर्ण किंवा ITI उत्तीर्ण केलेल्यांसाठी रेल्वेत नोकरीची संधी आहे. रेल्वे रिक्रूटमेंट सेल (RRC) मुंबईने फिटर, वेल्डर, टर्नर, मशीनीस्ट, कारपेंटर, पेंटर, मेकॅनिक, इलेक्ट्रीशियन, वायरमन, पाइप फिटर, प्लंबरसह अन्य विविध प्रकारच्या हजारो पदांवर अप्रेंटिसशिप भरतीसाठी जाहिरात दिली आहे. पश्चिम रेल्वेच्या कार्यकक्षेत विभिन्न विभागांच्या वर्कशॉपमध्ये एकूण ३,५९१ अप्रेंटिस पदे भरली जाणार आहेत.

वेस्टर्न रेल्वेमध्ये अप्रेंटिस भरतीसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया २५ मे २०२१ पासून सुरू होणार असून २४ जून पर्यंत इच्छुक उमेदवारांना अर्ज करता येणार आहेत. इच्छुक आणि योग्य उमेदवारांनी अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज करायचा आहे. ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी सविस्तर सूचना वेबसाइटवर उपलब्ध असतील.

या पदांवर भरती :

फिटर, वेल्डर (G & E), टर्नर, मशिनीस्ट, कारपेंटर, पेंटर (जनरल), मेकॅनिक (DSL आणि मोटर व्हेइकल), प्रोग्रामिंग अँड सिस्टीम अॅडमिनिस्ट्रेशन असिस्टंट, इलेक्ट्रीशियन, इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक, रेफ्रिजरेशन अँड एसी मेकॅनिक, वायरमन, पाइप फिटर, प्लंबर, ड्राफ्ट्समन (सिविल) आणि स्टेनोग्राफर (इंग्रजी)

शैक्षणिक पात्रता :

कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्डातून किमान ५० टक्के गुणांसह दहावी उत्तीर्ण असावे.

तांत्रिक पात्रता :

संबंधित ट्रेडमध्ये NCVT किंवा SCVT तून मान्यता प्राप्त संस्थेतून आयटीआय (ITI) सर्टिफिकेट असणे आवश्यक. अर्ज करण्यास इच्छुक उमेदवारांनी तांत्रिक योग्यतेविषयीची संपूर्ण माहिती नोटिफिकेशन लिंक वर क्लिक करून जाणून घ्यावी.

पश्चिम रेल्वे मुंबई अप्रेंटिस भरती 2021 चे नोटिफिकेशन

वयोमर्यादा :
उमेदवाराचे वय २४ जूनपर्यंत १५ ते २४ वर्षे यादरम्यान असावे. आरक्षित प्रवर्गांमधील उमेदवारांना सरकारी नियमांनुसार सवलत लागू होईल.

निवड प्रक्रिया :

RRC मुंबई मेरिट यादीच्या आधारे उमेदवारांची निवड करेल. दहावी आणि आयटीआय मध्ये मिळालेल्या गुणांच्या आधारे मेरिट यादी तयार केली जाईल. अंतिम निवड मूळ गुणपत्रिका आणि मेडिकल फिटनेस सर्टिफिकेटच्या पडताळणीनंतर होईल.

अर्ज शुल्क :

एससी, एसटी, पीडब्ल्यूडी आणि महिला अर्जदार वगळता अन्य सर्व उमेदवारांनी १०० रुपये अर्ज शुल्क भरावयाचे आहे.

पश्चिम रेल्वेच्या अधिकृत वेबसाइटवर जाण्यासाठी क्लिक करा.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

1 महिना ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

1 महिना ago

पुण्यात विषारी दारू प्यायल्याने १२ जणांचा मृत्यू, दोषींवर कठोर कारवाईचे आदेश

मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…

1 महिना ago

व्यसनमुक्ती क्षेत्रातील अविरत समाजकार्याची दखल; डॉ. सोमनाथ गिते यांचा मा. माधुरीताई मिसाळ यांच्या हस्ते सत्कार

पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…

2 महिने ago

भरतीच्या बोगस जाहिरातींपासून सावध राहण्याचे आवाहन

मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…

2 महिने ago

पुण्यात उष्णतेचा कहर! IMD चा यलो अलर्ट जारी; नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन

पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…

2 महिने ago