काम-धंदा

मंत्रालय उत्पादन व्यवस्थापक (मुद्रित प्रसिद्धी) उत्पादन अधिकारी (उत्पादन) सामान्य केंद्रीय सेवा गट अ राजपत्रित पद प्रतिनियुक्तीद्वारे भरण्याबाबतची जाहिरात

मंत्रालय उत्पादन व्यवस्थापक (मुद्रित प्रसिद्धी) उत्पादन अधिकारी (उत्पादन) सामान्य केंद्रीय सेवा गट अ राजपत्रित पद प्रतिनियुक्तीद्वारे भरण्याबाबतची जाहिरात

विषय : केंद्रीय संचार ब्युरो (सी बी सी) (जाहिरात आणि दृक प्रसिद्धी संचालनालय) (डी ए व्ही पी) आणि प्रकाशन विभाग संचालनालयाच्या (डी पी डी) कला आणि उत्पादन स्टाफच्या सामान्य संवर्गातील उत्पादन व्यवस्थापन (मुद्रित प्रसिद्धी)/ उत्पादन अधिकारी (उत्पादन) करिता ०१ रिक्त पद प्रतिनियुक्तीच्या आधारावर भरण्याबाबत.

संदर्भ : जाहिरात क्रमांक एक – २४०२२/६/२०२३ – एम यु सी – II दि. १७ नोव्हेंबर, २०२३.

वरील संदर्भीय विषयान्वये मंत्रालय उत्पादन व्यवस्थापक (मुद्रित प्रसिद्धी) उत्पादन अधिकारी (उत्पादन) सामान्य केंद्रीय सेवा गट अ राजपत्रित (मंत्रालयीन नसलेले) वेतन मॅट्रिक्स स्तर – ११ मध्ये ०१ पद प्रतिनियुक्तीद्वारे भरावयाचे आहे.

प्रतिनियुक्तीचा कालावधी – सुरुवातीला ०१ वर्षे (कमाल ३ वर्षे)

वर्गीकरण – सामान्य केंद्रीय सेवा , गट अ राजपत्रित, अ – मंत्रालयीन

भरतीची पद्धत – प्रतिनियुक्तीवर व बदली अनुसार

वयोमर्यादा – अर्ज सादर करण्याच्या शेवटच्या तारखेला ५६ वर्षे

वेतनस्तर – डी ओ पी टीच्या ओ एम क्र. क्र. ६/८/२००९- स्था. (पे- II) दिनांक १७-०६-२०१० आणि ओ एम क्र. २/६/२०१६ – स्था. (पे- II) दिनांक १७-०६-२०१६ मध्ये समाविष्ट असलेल्या तरतुदींनुसार व वेळोवेळी सुधारणा केल्यानुसार करण्यात येईल.

पे मॅट्रिक्स स्तर -११ (रु.६७७००- २०८७००) (पी बी -३ + जी पी रू ६६०० ची पूर्व – सुधारित वेतनश्रेणी)

अर्ज करण्याचा पत्ता व अर्जाची शेवटची मुदत – परिपूर्ण अर्ज परिशिष्ट – II मध्ये विहित पद्धतीत कक्ष क्र. १२५ – ए विंग, शास्त्री भवन, नवी दिल्ली, ११०००१ या ठिकाणी एम्प्लॉयमेंट न्यूजमध्ये ही जाहिरात प्रसिद्ध झाल्याच्या तारखेपासून ६० दिवसांच्या कालावधीत गेल्या ५ वर्षातील त्यांच्या अद्ययावत ए सी आर एस/ ए पी आर एस सह दोन प्रतींमध्ये पाठवावे.

यासंदर्भातील पात्रता अटी व अधिक माहितीसाठी सोबतची जाहिरात पहावी.

 

 

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

2 आठवडे ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

2 आठवडे ago

पुण्यात विषारी दारू प्यायल्याने १२ जणांचा मृत्यू, दोषींवर कठोर कारवाईचे आदेश

मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…

2 आठवडे ago

व्यसनमुक्ती क्षेत्रातील अविरत समाजकार्याची दखल; डॉ. सोमनाथ गिते यांचा मा. माधुरीताई मिसाळ यांच्या हस्ते सत्कार

पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…

3 आठवडे ago

भरतीच्या बोगस जाहिरातींपासून सावध राहण्याचे आवाहन

मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…

4 आठवडे ago

पुण्यात उष्णतेचा कहर! IMD चा यलो अलर्ट जारी; नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन

पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…

1 महिना ago