regular exercise may cut coronavirus death risk major study
देशात कोरोना संसर्गामुळे भीषण परिस्थिती ओढवली आहे. दररोज कोरोना रुग्णसंख्येत वाढ होत आहे. दुसरीकडे, कोरोनाच्या दुसर्या लाटेत बहुतेक रुग्ण श्वसनाच्या समस्येने पीडित आहेत. अशा परिस्थितीत, प्रत्येकजण कोरोनाचा संसर्ग टाळण्याचा किंवा कोरोनामुळे कमीतकमी गंभीर स्थितीपर्यंत न जाण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यातच दिलासादायक माहिती समोर आली आहे. एका अभ्यासानुसार असे दिसून आले आहे की काही व्यायाम केल्यामुळे आपल्याला होणारा कोरोना संसर्गाचा धोका 31 टक्क्यांपर्यंत कमी होतो.
व्यायामामुळे शरीर तंदुरुस्त राहते. एका नव्या अभ्यासात कोरोनाविरूद्धच्या लढाईत व्यायाम फायदेशीर असल्याचे सिद्ध झाले आहे. हा अभ्यास स्कॉटलंडमधील ग्लासगो कॅलेडोनियन विद्यापीठाच्या संशोधकांनी केला आहे. जगातील हा पहिला मोठा अभ्यास आहे, जो व्यायाम आणि कोविड -19 विरुद्ध प्रतिकारशक्ती यांचे एकत्रित अध्ययन करून केला गेला आहे. या अभ्यासानुसार, दिवसात 30 मिनिटे, आठवड्यातून 5 दिवस किंवा 150 मिनिटे व्यायाम केल्याने श्वसनाविषयीची समस्या उद्भवत नाही. यामध्ये चालणे, धावणे, सायकल चालविणे आणि स्नायू बळकट करण्यासाठीचे व्यायाम करण्याची शिफारस करण्यात आली आहे.
अभ्यासात असे स्पष्ट झाले आहे की अशा व्यायामामुळे लशीची कार्यक्षमता 40 टक्क्याने वाढते आणि लस अधिक प्रभावी देखील करते. वैज्ञानिकांच्या पथकाने म्हटले आहे की, “ठराविक वेळेपर्यंत व्यायाम केल्याने कोविड -१९ सारख्या संसर्गजन्य आजाराचा धोका 31 टक्क्यांनी कमी होतो आणि कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूचा धोका 37 टक्क्यांनी कमी होऊ शकतो.
ग्लासगो कॅलेडोनियन युनिव्हर्सिटीचे प्रोफेसर सेबॅस्टियन चॅस्टिन म्हणतात कि, “शारीरिक कार्यक्षमता रोगप्रतिकारक शक्तीचे संरक्षण करते आणि रोगप्रतिकारक पेशी अधिक मजबूत करते. नियमित शारीरिक व्यायाम संसर्गजन्य रोगापासून संरक्षण करते. तुम्ही स्वतःला सक्रिय ठेवले पाहिजे. हे आपल्याला केवळ शारीरिक आणि मानसिकदृष्ट्याच तंदुरुस्त ठेवते असे नाही. तर आता आपल्याकडे पुरावा देखील आहे की यामुळे रोग प्रतिकारशक्ती वाढवते. यामुळे कोरोना लसदेखील अधिक प्रभावी होते. यामुळेच आम्ही लोकांना लस देण्यापूर्वी 12 आठवडे शारीरिक ऍक्टिव्हिटी करण्याचा सल्ला देतो.
कोणते व्यायाम आपल्या फुफ्फुसांसाठी फायदेशीर ठरू शकतात ?
पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…
बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…
नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…
पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…