ग्लोबल

महिलेने शॉवर घेताना बाथरूममध्येच दिला मुलाला जन्म, गर्भवती असल्याची कल्पनाच नव्हती…

ऑस्ट्रेलिया : एका महिलेने शॉवर घेताना बाथरूममध्येच मुलाला जन्म दिला. विशेष म्हणजे, या महिलेसाठी हा खूपच मोठा धक्का होता, कारण ती गर्भवती असल्याची त्या महिलेला कल्पनाच नव्हती. डीमिटी बोनेट (Dimitty Bonnet) या २८ वर्षीय महिलेला अगोदरच २ मुले आहेत, डिमिटी आणि तिचा पती जेसन (वय 42) यांना ती गरोदर असल्याची माहिती नव्हती. आश्चर्यजनक गोष्ट अशी की डिमिटीला नियमित मासिक पाळी येत होती आणि काही आठवड्यांपूर्वी तिची गर्भधारणा चाचणी नकारात्मक आली होती.

आधीच दोन मुलांची आई असलेल्या डीमिटी हिला शॉवरमध्ये असताना अचानक कळ आल्यासारखी वाटली, तेव्हा ती पूर्णपणे चकित झाली आणि तिला तिच्या पायांमध्ये बाळाचे डोके दिसले. 26 फेब्रुवारी 2022 रोजी रात्री 1.30 वाजता हा सर्व प्रकार घडला. तिचा नवरा त्या वेळी झोपलेला होता. तिने मदतीसाठी त्याला हाक मारली तेव्हा त्याने बाथरूममध्ये धाव घेतली, त्याला डीमिटी रक्ताच्या थारोळ्यात बाळाला धरून बसलेली दिसली. तिला जन्म देण्याच्या आदल्या दिवशी संध्याकाळी थोडेसे अस्वस्थ वाटू लागले होते, त्याआधी काहीही वेगळे आहे याची तिला कल्पना नव्हती.

न्यू साउथ वेल्स, ऑस्ट्रेलिया येथील डिमिटी म्हणाली की माझ्या संपूर्ण आयुष्यात माझ्या वजनात अनेकदा चढ-उतार होत राहतात. त्यामुळे काही पौंड वजन वाढले तेव्हा मला याबद्दल काहीही वाटले नाही. मी गृहित धरले की ते फक्त लॉकडाउनमुळे  वाढलेले वजन आहे. मी एक महिना आधी विमानात प्रवास केला होता आणि जन्म देण्याच्या सहा आठवड्यांपूर्वी रग्बी खेळताना झालेल्या दुखापतीनंतर एक्स-रेही काढला होता. दरम्यान, मी खात्री करण्यासाठी जन्म देण्याच्या एक महिना आधी गर्भधारणा चाचणी देखील केली होती आणि ती नकारात्मक आली होती.

डिमिटी पुढे म्हणाली कि, बाळाच्या जन्माच्या आदल्या संध्याकाळी माझे पोट थोडेसे दुखत होते, म्हणून मी मुलांना लवकर झोपायला लावले आणि स्वत: लवकर झोपले. मी मध्यरात्री 1 च्या सुमारास उठले आणि मला खूप अस्वस्थ वाटले. मला खरोखर शौचालयात जायचे होते, परंतु मी जाऊ शकले नाही. वेदना आणखी वाढू लागल्या, म्हणून मी बरे वाटण्यासाठी शॉवर घेण्याचा निर्णय घेतला. मला माझ्या नवऱ्याला उठवायचे नव्हते, म्हणून मी लाईट बंद करून अंधारात आंघोळ केली. त्यानंतर कळ आली आणि मला अचानक बाळाचे डोके दिसले. गोंधळलेल्या अवस्थेत ती अंधारात जमिनीवर बसली आणि तिच्या बाळाचा जन्म झाला.

त्यानंतर तिने आपल्या नवऱ्याला बोलावले, तो बाथरुममध्ये धावत आला आणि त्याला डीमिटी रक्ताच्या थारोळ्यात बाळाला धरून बसलेली दिसली. हे पाहून त्याला धक्काच बसला. त्यानंतर त्यांनी अॅम्ब्युलन्सला बोलावले, जे सुमारे 15 मिनिटांनंतर आले. आई आणि बाळ ठीक असल्याची खात्री केल्यानंतर, ते कुटुंबाला कॅम्पबेलटाऊन हॉस्पिटल, न्यू साउथ वेल्समध्ये घेऊन गेले, जिथे त्यांना 24 तास देखरेखीखाली ठेवले. डिमिटी आणि जेसनने त्यांच्या बाळाचे नाव हार्वे एरिक बॅरी टिमिन्स ठेवले, त्याचे वजन 6lbs 8oz होते.

डिमिटी म्हणाली की तिच्या इतर दोन गर्भधारणा खूप वेगळ्या होत्या आणि असे काही घडू शकते असे तिला कधीच वाटले नव्हते. जे घडले त्यावर प्रक्रिया करण्यासाठी माझ्या मेंदूला आणि शरीराला थोडा वेळ लागला आहे, पण आम्ही आता अधिक स्थिरावलो आहोत. तो एक आश्चर्यकारक बाळ आहे आणि जरी सुरुवातीला हा खूप मोठा धक्का असला तरी त्याला कुटुंबात सामील करून घेण्यासाठी आम्ही खूप भाग्यवान आहोत.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

2 आठवडे ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

2 आठवडे ago

पुण्यात विषारी दारू प्यायल्याने १२ जणांचा मृत्यू, दोषींवर कठोर कारवाईचे आदेश

मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…

2 आठवडे ago

व्यसनमुक्ती क्षेत्रातील अविरत समाजकार्याची दखल; डॉ. सोमनाथ गिते यांचा मा. माधुरीताई मिसाळ यांच्या हस्ते सत्कार

पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…

3 आठवडे ago

भरतीच्या बोगस जाहिरातींपासून सावध राहण्याचे आवाहन

मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…

3 आठवडे ago

पुण्यात उष्णतेचा कहर! IMD चा यलो अलर्ट जारी; नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन

पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…

4 आठवडे ago