ग्लोबल

Bungee Jumping करताना दोरी तुटल्यामुळे महिलेचा मृत्यू, धक्कादायक VIDEO आला समोर

कजाकिस्तान : अशा खेळांदरम्यान मृत्यू झाल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. सध्या असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यात दिसतं, की एक महिला अॅडवेंचर खेळात भाग घेते, मात्र हा तिच्या आयुष्यातील शेवटचा खेळ ठरतो.

कजाकिस्तानमध्ये राहणारी ३३ वर्षीय येवजीनिया लिओन्तिया तीन मुलांची आई होती. दोन तिची मुलं होती तर तिसरा तिच्या नातेवाईकांचा मुलगा होता. ज्याचा सांभाल तिच करायची. येवजीनिया आपल्या पती आणि मित्रांसोबत कारागांडा शहरातील एका हॉटेलमध्ये गेली होती. याच्या छतावर बंजी जंपिंग (Bungee Jumping) अॅडवेंचर गेम खेळली जाते. यात व्यक्तीच्या कमरेला रस्सी बांधली जाते आणि यानंतर या व्यक्तीला उंचावरून खाली सोडलं जातं. यानंतर व्यक्ती हवेतच या रस्सीच्या सहाय्याने लटकत राहातो. येवजीनियाचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यात ती उंचावर उभी असून बंजी जंपिंग करताना दिसते. मात्र, तिच्यासोबत मोठी दुर्घटना घडते.

मिळालेल्या माहितीनुसार, महिलेचा पती तिचा व्हिडिओ शूट करत होता. महिला छतावर दोरी बांधून उभा होती. अचानक तिनं खाली उडी घेतली मात्र दोरी व्यवस्थित नसल्यानं हवेत लटकण्याऐवजी ती थेट जमिनीवर कोसळली आणि एका भिंतीला जाऊन धडकली. खाली उपस्थित असलेल्या लोकांनी तिला वाचवण्याचा भरपूर प्रयत्न केला. ती जखमी झालेली होती. लगेचच तिला रुग्णालयात घेऊन जाण्यात आलं मात्र सर्जरीदरम्यानच तिचा मृत्यू झाला.

या महिलेनं याआधीही अनेकदा बंजी जंपिंग केली असल्याचं समोर आलं आहे. या घटनेनंतर पोलिसांनी तपास सुरू केला आहे. हत्येच्या अँगलनंही पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. बंजी जंपिंगच्या ऑर्गनायजर्सविरोधात केस दाखल करण्यात आली आहे. पोलिसांचं असं म्हणणं आहे, की ही रस्सी कमजोर होती ज्याकडे दुर्लक्ष केलं गेलं. उडी घेणाऱ्या व्यक्तीला दोन दोऱ्यांनी बांधलेलं असतं, मात्र यात एक दोरी तुटल्यानं ही मोठी दुर्घटना घडली.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

2 आठवडे ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

2 आठवडे ago

पुण्यात विषारी दारू प्यायल्याने १२ जणांचा मृत्यू, दोषींवर कठोर कारवाईचे आदेश

मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…

2 आठवडे ago

व्यसनमुक्ती क्षेत्रातील अविरत समाजकार्याची दखल; डॉ. सोमनाथ गिते यांचा मा. माधुरीताई मिसाळ यांच्या हस्ते सत्कार

पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…

3 आठवडे ago

भरतीच्या बोगस जाहिरातींपासून सावध राहण्याचे आवाहन

मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…

4 आठवडे ago

पुण्यात उष्णतेचा कहर! IMD चा यलो अलर्ट जारी; नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन

पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…

1 महिना ago