ग्लोबल

काबूल स्फोटानंतर अमेरिकेची दहशतवाद्यांविरोधात मोठी कारवाई, अफगाणिस्तानात ISIS वर ड्रोन हल्ला

काबुल : काबूल विमानतळावर बॉम्बस्फोट करण्यात आले होते. यात अमेरिकेच्या 13 सैनिकांसह अनेक लोक मारले गेले होते. या हल्ल्याची जबाबदारी ISIS ने घेतली होती. यानंतर राष्ट्राध्यक्ष जो बायडेन नाराजी व्यक्त करत म्हणाले होते की अमेरिका आपल्या शत्रूंना शोधून मारेल. यानंतर 36 तासांच्या आत अमेरिकेने दहशतवाद्यांविरोधात कारवाई केली आहे. अमेरिकन लष्कराने पूर्व अफगाणिस्तानमध्ये ISIS च्या ठिकाणांवर ड्रोनने हल्ले केले आहेत. पेंटागनने याबद्दल माहिती दिली आहे.

अमेरिकेच्या लष्कराचे प्रवक्ते नौदल कॅप्टन बिल अर्बन यांनी सांगितले की, अमेरिकन सैन्याने अफगाणिस्तानच्या नांगरहार प्रांतातील ISIS-के तळांवर हवाई हल्ले केले आहेत. यात आमचे लक्ष्य असलेले दहशतवादी मारले गेल्याचे संकेत आहेत. या हल्ल्यात एकही नागरिक मारला गेलेला नाही. अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षा संघाने अध्यक्ष बायडेन यांची भेट घेऊन काबूल विमानतळावर सुरक्षा वाढवण्यास सांगितले आहे. अमेरिका काबूल विमानतळावर सुरक्षा व्यवस्था वाढवत आहे. काबूल विमानतळावर आणखी दहशतवादी हल्ले होण्याची शक्यता अमेरिकेने व्यक्त केली आहे.

अमेरिकेने अफगाणिस्तानच्या नांगरहारमध्ये हवाई हल्ला केला आहे. ISIS च्या दहशतवाद्यांचा नांगरहारमध्ये गड आहे. हा परिसर अफगाणिस्तान आणि पाकिस्तानच्या सीमेवर आहे. तालिबानने अफगाणिस्तानचा ताबा घेतल्यानंतर तुरुंगातील अनेक दहशतवाद्यांची सुटका केली आहे, त्यात ISIS च्या दहशतवाद्यांचाही समावेश आहे.

काबूल विमानतळावरील साखळी स्फोटानंतर अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यांनी दहशतवाद्यांना निवडकपणे मारण्याचा इशारा दिला होता. अमेरिकन लष्कराने अफगाणिस्तानमध्ये इसिसच्या ठिकाणांवर हवाई हल्ले करून त्यांचे हे लक्ष्य साध्य केले.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

स्वातंत्र्यदिनानिमित्त डॉ. सोमनाथ गिते यांचा महापौरांच्या हस्ते गौरव

पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…

4 दिवस ago

लग्न ठरलेल्या प्रियकरासोबत तरुणीचा संशयास्पद मृत्यू; आईचा गंभीर आरोप

बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…

1 आठवडा ago

चार महिन्यांपूर्वीचा नवाकोरा रस्ता ऑप्टिकल फायबरसाठी फोडला; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांचा संताप; काम बंद पाडून अधिकाऱ्यांना जाब

नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…

1 आठवडा ago

‘उघडलेले पुस्तक’ पॅनेलचा दणदणीत विजय; सर्व १५ उमेदवार विजयी; सर्व प्रवर्गांत परिवर्तन आणि सुशासन पॅनेलला यश

पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…

2 आठवडे ago

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

3 महिने ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

3 महिने ago