russian scientist mysterious death suspected death of russias leading scientist working on corona virus vaccine
कोरोना व्हायरस लस तयार करण्यात गुंतलेले एक रशियन शास्त्रज्ञ संशयास्पद मृतावस्थेत आढळले आहेत. वृत्तानुसार 45 वर्षीय शास्त्रज्ञ अलेक्झांडर साशा कागनस्की आपल्या फ्लॅटच्या 14 व्या मजल्यावरून पडले. घटनेच्या वेळी ते फक्त अंडरवेअरवर होते. त्यांच्या शरीरावर चाकूच्या हल्ल्याच्याही अनेक खुणा व जखमा आहेत. अलेक्झांडर कोरोनाच्या कोणत्या लसीवर कार्य करत होते हे स्पष्ट झाले नाही. याप्रकरणी एका संशयितालाही अटक करण्यात आली आहे. अटक केलेल्या व्यक्तीचे वय 45 वर्षे आहे. कागनस्की यांचे यूकेमधील एडिनबर्ग विद्यापीठाशी संबंध होता. कागनस्कीने सुमारे 13 वर्षे स्कॉटलंडमध्ये काम केले होते.
रशियन मीडियाच्या वृत्तानुसार, फ्लॅटच्या 14 व्या मजल्यावरून खाली पडण्यापूर्वी कागनस्की यांचे कोणाशीतरी भांडण झाल्याचे पोलिसांचे मत आहे. अलेक्झांडरच्या मृत्यूला ते संभाव्य खून मानतात आणि अटक केलेल्या 45 वर्षांच्या व्यक्तीची चौकशी करत असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. कागनस्की यांनी रशियातील एका विद्यापीठात सेंटर फॉर जीनोमिक आणि रीजनरेटिव्ह मेडिसिनचे संचालक म्हणूनही काम पाहिले आहे. अलीकडेच रशियन सरकारने त्यांना संशोधनासाठी अनुदान दिले होते.
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…
मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…
पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…
मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…
पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…